Take a fresh look at your lifestyle.

स्टेट बॅंकेचे गोल्ड लोन झाले स्वस्त, कमी व्याजदरात मिळणार कर्ज, अर्ज कसा करायचा पाहा..?

नवी दिल्ली : कोरोनामुळे अनेक जण आर्थिक अडचणीत आले. पैशांची चणचण जाणवत असल्याने काहींनी कर्जासाठी बॅंकांचे दार ठोठावण्यास सुरवात केली आहे. तुम्हीही असेच कर्जासाठी प्रयत्न करीत असाल, तर देशातील सर्वात मोठी बँक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांसाठी गोल्ड लोन (Gold Loan) खूप सोपे केले आहे.

Advertisement

सर्वात कमी कागदपत्रांवर स्टेट बँक ‘गोल्ड लोन’ देत आहे. ‘एसबीआय’ कमीत कमी 20 हजार, तर जास्तीत जास्त 50 लाख रुपयांपर्यंत ‘गोल्ड लोन’ देत आहे. त्यासाठीचा व्याजदरही माफक असल्याने ग्राहकांचा मोठा फायदा होणार आहे.

Advertisement

कोरोनामुळे अनेकांवर आर्थिक आणीबाणी आलीय. खिशात पैसा नसल्याने छोटा-मोठा व्यवसायही करता येत नाही. अशा वेळी सोन्याचे दागिने वा नाणी गहाण ठेवून बॅंकांकडून कर्ज घेणे कधीही सोयीस्कर ठरते. गोल्ड लोन हा सर्वात जलद, सुरक्षित आणि सोपा मार्ग मानला जातो.

Advertisement

स्टेट बॅंकेने ग्राहकांची गरज ओळखून कमीत कमी कागदपत्रांवरच Gold Loan देण्यास सुरवात केली आहे. त्यासाठी सध्या किमान 7 टक्के, तर जास्तीत जास्त 29 टक्के व्याजदराने हे गोल्ड लोन दिले जात आहे. तुम्ही YONO खात्यात लॉगिन करून SBI कडे Gold Loan साठी अर्ज करू शकता. शिवाय थेट एसबीआय शाखेला भेट देऊनही Gold Loan मिळू शकेल.

Advertisement

असा करा ऑनलाईन अर्ज..

Advertisement
 • तुमच्या YONO खात्यात (YONO Account) लॉगिन करा. मुख्यपृष्ठाच्या वरच्या डाव्या बाजूला ‘मेनू’ क्लिक करा.
 • लोन ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर गोल्ड लोनचा पर्याय निवडा. अप्लाय नाऊवर क्लिक करा.
 • ड्रॉपडाऊनमध्ये दिलेल्या सर्व तपशीलांसह दागिन्यांचा प्रकार, प्रमाण, कॅरेट आणि निव्वळ वजन यासारखे सर्व तपशील भरा.
 • तुमचे निव्वळ मासिक उत्पन्न टाका आणि सबमिट करा.
 • तुम्हाला पत्ता पुरावा आणि ओळख पुरावा द्यावा लागेल.

  बॅंकेत अर्ज कसा करावा?

 • SBI शाखेतून Gold Loan साठी तुमचे सोन्याचे दागिने शाखेत घेऊन जा.
 • Gold Loan साठी 2 फोटो आणि केवायसी दस्तऐवजांसह शाखेला भेट द्या.
 • सबमिट केलेल्या सर्व कागदपत्रांवर आणि कर्जाच्या फॉर्मवर स्वाक्षरी करा.
 • यानंतर तुमचे सोने होईल आणि तुम्हाला Gold Loan मिळेल.
 • एसबीआय ग्राहकांना जास्तीत जास्त 36 महिन्यांच्या कालावधीसाठी गोल्ड लोन देत आहे.

  कोण घेऊ शकते गोल्ड लोन?

 • उत्पन्नाचे स्थिर स्त्रोत असलेले 18 वर्षांवरील व्यक्ती एसबीआय गोल्ड लोन घेऊ शकतात.
 • पेन्शनर एसबीआय गोल्ड लोनसाठी अर्ज केल्यास उत्पन्नाचा पुरावा आवश्यक नाही.

नर्सने केलाय मोठाच घोटाळा; करोना लसीकरण म्हणून साडेआठ हजारांना दिले ‘त्याचे’ इंजेक्शन..!
मोदी सरकारच्या निर्णयाने सगळेच चक्रावले; बंदी असलेल्या शेतमालास भारताचे दरवाजे खुले केले..!

Advertisement
Advertisement

Leave a Reply