Take a fresh look at your lifestyle.

गौतम अदानी पाहतायेत ‘हे’ मोठे स्वप्न; ‘फेरारी’प्रमाणेच टाटा-रिलायंसला दणका देण्याची आहे तयारी..!

मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीज आणि टाटा ग्रुपनंतर आता अदानी ग्रुपही भारतातील कम्युनिकेशन मार्केटमध्ये प्रवेश करण्याची तयारी करत आहे. अदानी समूह भारतीय बाजारात जगातील सर्वात मोठे अॅप लॉन्च करण्याची तयारी करत आहे. ज्याला सुपर अॅप म्हटले जाईल. अदानी ग्रुपच्या डिजिटल लॅबद्वारे सुपर अॅप लाँच केले जाणार आहे.

Advertisement

अदानी समूहाचे हे सुपरअॅप जिओ, टाटा, पेटीएम आणि आयटीसी सारख्या कंपन्यांशी स्पर्धा करणार आहे. एका रिपोर्टनुसार अदानी ग्रुपच्या सर्व कंपन्या 15 टक्क्यांपर्यंत स्थिर वाढ नोंदवत आहेत. अलीकडेच अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांची डिजिटल लॅब्जच्या टीमसोबत बैठक झाली आहे. या बैठकीत सुमारे 80 तरुण कर्मचारी सहभागी झाले होते. बैठकीत संबोधित करताना अदानी म्हणाले की, आपण डिजिटल जगाचे फेरारी व्हायला हवे. आम्हाला भारतातील प्रत्येक व्यक्तीच्या सोयीनुसार सुपर अॅप डिझाईन करावे लागेल.

Advertisement

Advertisement

अदानीच्या सुपर अॅपचा उद्देश सर्व प्रकारच्या सेवा एकाच अॅपमध्ये समर्थित करणे आहे. उदाहरणार्थ, रेल्वे तिकीट बुकिंगपासून कॅब बुकिंग आणि पैसे भरण्यापासून ऑनलाईन शॉपिंगपर्यंत सेवा एकाच अॅपमध्ये उपलब्ध असतील. सोप्या भाषेत सांगायचे तर तुमच्या सर्व आवश्यक गरजा एका अॅपद्वारे पूर्ण केल्या जातील.

Advertisement

दरम्यान, देशाच्या FMCG अर्थात फास्ट मूव्हिंग कन्झ्युमर गुड्समधील सर्वात मोठी कंपनी असलेल्या ITC ने देखील आपले सुपर अॅप सादर करण्याचे नियोजन केले आहे. ITC MAARS या अॅपचा उद्देश शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे हा असेल, असे म्हटलेले आहे. जागतिक पातळीवर आयटीसीचे अॅप लॉन्च करण्याची योजना आहे. त्यामुळे आता भारतात या क्षेत्रात अनेक दिग्गज कंपन्या एकमेकांशी भिडणार आहेत.

Advertisement
Advertisement

Leave a Reply