Take a fresh look at your lifestyle.

आय्योव.. 65 ट्रिलियन रुपये खर्च करूनही अमेरिका तोंडघशी..! पहा बायडेन प्रशासनाला कसा बसलाय झटका

मुंबई : जगात आर्थिकदृष्ट्या आणि संरक्षण क्षेत्रात सर्वात मोठा पहिलवान असलेल्या अमेरिकेला आता मोठाच झटका बसला आहे. कारण, अफगाणिस्तान हा देश तालिबानपासून सुरक्षित राहवा म्हणून गेल्या दोन दशकांपासून अमेरिकन आणि नाटोचे सैन्य तेथे तैनात होते. तालिबानशी सामना करण्यासाठी आणि अफगाण सैन्याला मदत करण्यासाठी अमेरिकेने या कारवाईत सुमारे 10,000 सैनिक तैनात केले होते. मात्र, वीस वर्षांनी हे सगळेच बाहेर पडल्यावर अवघ्या जगाला धक्का देणारे कृत्य धर्मांध माथेफिरू तालिबानी दहशतवाद्यांनी करून दाखवले आहे.

Advertisement

अमेरिकन सैन्याने तालिबानचा पराभव करण्यासाठी सुमारे तीन लाख अफगाण सैन्याला प्रशिक्षण दिले होते. अमेरिकेने शस्त्रे, उपकरणे आणि देशाच्या सुरक्षा दलांच्या प्रशिक्षणावर सुमारे 65 ट्रिलियन रुपये खर्च केले आहेत. अमेरिकेने अफगाण सैनिकांना अत्याधुनिक लष्करी उपकरणांनी सुसज्ज केले होते. अमेरिकन सैनिकांनी अफगाण हवाई दलाच्या देखभालीची जबाबदारीही घेतली होती. या संपूर्ण मोहिमेत अमेरिकेने आपले 2300 सैनिकही गमावले होते. इतके सगळे करूनही अफगाणी सैन्याने न लढता आपला देश थेट तालिबानी माथेफिरूंच्या ताब्यात देण्याचे ‘कर्तव्य’ बजावले आहे.

Advertisement

Advertisement

अमेरिकेच्या सैन्याने 20 वर्षांच्या संघर्षानंतर सर्वात मोठी लष्करी चौकी बाग्राम एअर बेस सोडली होती. येथे एनर्जी ड्रिंक्सपासून ते बख्तरबंद वाहने, हेलिकॉप्टर, लष्करी वाहने, नागरी वाहने, शस्त्रे आणि दारुगोळा यांचा समावेश होता. तथापि, 984 सी 17 वाहतूक विमानांद्वारे मोठ्या प्रमाणावर साहित्य देखील अमेरिकेने देशाबाहेर पाठवले होते. अमेरीकी सैनिकांनी बाबा मीरच्या प्रचंड जंगलातील टाक्या, तोफखाना आणि इतर शस्त्रे नष्ट केली होती. हा देश सुरक्षित राहण्यासाठी काही शस्त्रे परत घेण्याऐवजी ती अफगाण सैन्याच्या हवाली केली गेली.

Advertisement

आंतरराष्ट्रीय माध्यमांच्या अहवालानुसार असा अंदाज आहे की अफगाणिस्तान सोडण्यापूर्वी अमेरिकन सैनिकांनी सुमारे 1500 ते 1700 लष्करी उपकरणे नष्ट केली. घरी परत घेणे शक्य नव्हते. यापैकी 387 दशलक्ष पौंड (176 दशलक्ष किलोग्राम) भंगार आधीच अफगाणिस्तान सरकारला 46.5 दशलक्ष डॉलरला विकले गेले आहे. तर काही शस्त्रे अफगाण सैनिकांना देण्यात आली आहेत. आता त्यातालीचे अनेक शस्त्रास्त्रे थेट तालिबानी माथेफिरूंच्या ताब्यात गेल्याने जगाची चिंता जास्त वाढली आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या प्रशासनाला हा मोठा धक्का आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply