Take a fresh look at your lifestyle.

येस बॅंक सुरु करणार नवी कंपनी, भागीदार होण्यासाठी मागविले अर्ज..!

मुंबई : केवळ १६ वर्षांच्या कारकीर्दीत येस बँक नावारूपाला आली. खासगी क्षेत्रातील अग्रगण्य बँकही बनली. नामंकित उद्योगपतींना कर्जे देऊन त्यांचे उद्योग भरभराटीला आणण्यास या बॅंकेने साह्य केले. मात्र, त्यानंतर बॅंकेला ओहोटी लागली. स्वतःच्या क्षमतेपलिकडे जाऊन येस बँकेने कर्जवाटप केले. मात्र, त्याच्या वसुलीकडे अक्षम्य दुर्लक्ष केले. त्यामुळे बँकेची अनुत्पादक कर्जे प्रचंड वाढली. शेवटी जे व्हायला नको, तेच झाले. बॅंक बुडण्याची वेळ आली.

Advertisement

आता या धक्क्यातून सावरत, कठीण परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी येस बँकेने मालमत्ता पुनर्रचना कंपनी (ARC) सुरु करण्याची तयारी केली आहे. त्यासाठी बँकेने संभाव्य गुंतवणूकदारांकडून एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट (EoI) मागविले आहेत. ‘एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट’ म्हणजे कोणतीही अशी कंपनी जी येस बँकेच्या या बिझनेस प्लॅनमध्ये गुंतवणुकीद्वारे सहभागी होऊ शकते, त्यासाठी अर्ज पाठवू शकते. येस बँकेने त्यासाठी ‘अर्न्स्ट अँड यंग’ला सल्लागार म्हणून नेमले आहे.

Advertisement

‘एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट’साठी येस बँकेने वर्तमानपत्रात जाहिरात दिली होती. त्यात बँकेने मजबूत बॅलेन्सशीटवाली आणि डिस्ट्रेस्ड एसेट व्यवसायात काम करणाऱ्या कंपन्यांकडून अर्ज मागविले आहेत. संभाव्य गुंतवणूकदार ARCचे मुख्य भागीदार किंवा प्रायोजकही बनू शकतात.

Advertisement

प्रस्तावित राष्ट्रीय मालमत्ता पुनर्रचना कंपनी (NACL) किंवा बॅड बँकेचा भाग होणार नसल्याचे येस बँकेने आधीच सुचित केले होते. येस बँक स्वतःची मालमत्ता पूनर्रचना कंपनी स्थापन करून अधिक चांगली कर्जवसूली करू शकते, असा विश्वास बँकेला आहे.

Advertisement
भागिदारीसाठीचे निकष
  • मार्च 2021 मध्ये संपलेल्या आर्थिक वर्षात जागतिक स्तरावर किमान 5 अब्ज डॉलर्सचे मालमत्ता व्यवस्थापनाचे काम करणाऱ्याच कंपन्या येस बँक बँकेच्या ARC साठी अर्ज करू शकतात.
  • गुंतवणूकदाराकडे भारतीय बाजारात ५० कोटी डॉलरची गुंतवणूक करण्याची क्षमता असणे आवश्यक आहे.
  • संभाव्य गुंतवणूकदारांकडे डिस्ट्रेस्ड एसेट मॅनेजमेंट आणि NPA च्या वसूलीचा जागतिक अनुभव असणे आवश्यक आहे.
  • गुंतवणूकदारांना RBIचे ‘fit and Proper’ निकषदेखील पूर्ण करावे लागतील.

येस बँकेच्या ARC साठी अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2021 आहे. येस बँकेच्या नवीन उपक्रमामुळे बँकेला त्यांचे बॅड एसेट्स साफ करण्यास मदत होणार असल्याचे बॅंकिंग तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Advertisement

सरकारी मालमत्ता विकून 6 लाख कोटींचा निधी उभारण्याचा निर्णय, मोदी सरकार काय काय विकणार पाहा..?
कांदा मार्केट स्थिरावलेय; पहा पुणे, नाशिक, नगर, सोलापूर पट्ट्यासह राज्यभरातील मार्केट स्थिती

Advertisement
Advertisement

Leave a Reply