Take a fresh look at your lifestyle.

आठवड्याचा शेवट तेजीत..! सोन्याच्या घसरणीला लागला ब्रेक, चांदीलाही झळाळी..!

नवी दिल्ली : मागील काही दिवसांपासून सोन्याच्या भावात सुरु असणाऱ्या घसरणीला आठवड्याच्या शेवटच्या दिवशी आज (शुक्रवारी) ब्रेक लागला. दिल्ली सराफा बाजारात आज सोन्याच्या भावात 222 रुपये, तर चांदीचे भाव 100 रुपयांनी वाढले. या वाढीनंतर बाजार बंद होताना सोने प्रति तोळा 45,586 रुपयांवर, तर चांदीची किंमत 61,045 रुपये प्रति किलोवर होती.

Advertisement

सोन्याचे दर या आठवड्याच्या सुरुवातीला चार महिन्यांच्या निच्चांकी पातळीवर होते. त्यात आज काहीशी सुधारणा झाली. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर (Gold Prices) स्थिर होते. स्पॉट गोल्डच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नसून, आजचा दर 1,752.78 डॉलर प्रति औंस होता. या आठवड्यात दर 0.5 टक्क्यांनी कमी झाले आहेत. अमेरिकन सोन्याची वायदे किंमत 0.2% ने वाढून 1,754.40 डॉलरवर आहे.

Advertisement

देशांतर्गत बाजारात ‘एमसीएक्स’ (MCX)वर ऑक्टोबरमध्ये संध्याकाळी 4.25 वाजता डिलिव्हरीसाठी सोने 202 रुपयांनी वाढून 46565 रुपये प्रति दहा ग्रॅम होते. डिसेंबर डिलिव्हरीसाठी सोने 160 रुपयांनी वाढून 46735 रुपये प्रति दहा ग्रॅमवर ​​होते.

Advertisement

सप्टेंबर डिलिव्हरीसाठी चांदी 619 रुपयांनी वाढून प्रति किलो 62479 रुपये, डिसेंबरमध्ये डिलिव्हरीसाठी चांदी 590 रुपयांनी वाढून प्रतिकिलो 63198 रुपये आणि मार्च 2022 मध्ये डिलिव्हरीसाठी चांदी 600 रुपयांनी वाढून प्रतिकिलो 63956 रुपये झाली.

Advertisement

दरम्यान, आता तुम्हाला घरबसल्या सोन्याचे दर माहिती करुन घेता येणार आहेत. त्यासाठी फक्त 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही लेटेस्ट दर तपासू शकता.

Advertisement

आता जर तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर यासाठी सरकारने एक अॅप बनवले आहे. ‘बीआयएस केअर अॅप’द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे आपण केवळ सोन्याची शुद्धता तपासू शकत नाही तर आपण त्याच्याशी संबंधित कोणतीही तक्रार देखील करू शकता..

Advertisement

शेतीकर्जमाफीऐवजी जाहिरातबाजीवर १६० कोटींची उधळपट्टी..! महाविकास आघाडीवर पाचपुतेंची दणक्यात टीका
Share Market Latest Update : आणि म्हणून सेन्सेक्सने पार केला 55 हजारांचा टप्पाही..!

Advertisement
Advertisement

Leave a Reply