Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. चीनमधील ‘तो’ धक्कादायक प्रकार झालाय व्हायरल; चीनी नागरीकांवर होतोय ‘असा’ अन्याय..?

मुंबई : सध्या चीन देशामधील व्हिडीओ असल्याचे सांगून सोशल मीडियामध्ये काही धक्कादायक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहेत. हे व्हिडिओ खरे की खोटे याबाबत अनेकांनी मतभेद व्यक्त केलेले आहेत. मात्र, एकून करोना संकट आणि त्यामुळे चीनी नागरिकांना केली जाणारी दडपशाही चर्चेत असताना या शेअरिंग व्हिडिओमुळे अनेकजण चक्रावले आहेत. या हुकुमशाही देशात नेमके काय चालू आहे हेच माहित नसल्याने याच व्हायरल गोष्टी सत्य मानल्या जात आहेत.

Advertisement

Advertisement

जगभरात व्हायरल होत असलेल्या व्हिडिओला चीनचे असल्याचे म्हटले जात आहे. ज्यामध्ये करोनाच्या डेल्टा व्हायरसला आटोक्यात आणण्यात चीनी अपयशी ठरले आहेत. अशावेळी नागरिकांनी घराबाहेर पडू नये म्हणून चक्क त्यांना घरात डांबले जात आहे. किंवा थेट दरवाजे लावून त्यांना कुलुपबंद केले जात आहे.

Advertisement

तैवान न्यूज यांच्यासह ट्विटर आणि अनेक सोशल मिडिया वेबसाईटवर सध्या या व्हिडिओची चलती आहे. काही व्हिडिओमध्ये तर दरवाजाला थेट खिळे ठोकून बंद केले जात असल्याचे दाखवले जात आहे. एकूणच यामुळे अवघ्या जगामध्ये भीतीचे वातावरण पसरत आहे. ANI नुसार, Weibo, Twitter आणि YouTube वर असे अनेक व्हिडिओ शेअर केले जात आहेत. त्याचे वास्तव नेमके काय आहे, हे मात्र अजूनही स्पष्ट झालेले नाही.

Advertisement

Advertisement
Advertisement

Leave a Reply