Take a fresh look at your lifestyle.

मोदी सरकारचा अच्छा झटका..! पाचच दिवसात सोयाबीनचे भाव 30 % डाऊन; पहा नेमके काय बजावलेय कर्तव्य

पुणे : शेतकऱ्यांनी सोयाबीन 3 हजार रुपये क्विंटलने विकल्यावर देशभरात खाद्यतेलाचे भाव भडकल्याने या शेतमालाचे भाव तब्बल 10 हजारांना जाऊन पोहचले होते. दरम्यान, आता काहीच दिवसात पुन्हा जोरात सोयाबीन आवक बाजारात होणार असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने सोयामिल आयातीला हिरवा कंदील दाखवून या पिकाचे भाव 7 हजार रुपये प्रतिक्विंटलवर आणलेले आहेत. अवघ्या पाचच दिवसात नागपूरसह अनेक बाजार समितीत भाव किमान 30 टक्के कमी झालेले आहेत.

Advertisement

केंद्र सरकारने खरीप हंगामाच्या तोंडावर १५ लाख टन जेनेटिक मॉडिफाइड (जीएम) सोयामील आयातीचा निर्णय घेतला आहे. त्याचे परिणाम बाजारात दिसण्यास सुरुवात झाली आहे. वर्षभरात व्यापाऱ्यांनी शेतकरी सोयाबीनवर पैसे दुप्पट किंवा तिप्पट केले त्यावेळी केंद्र सरकारने अशी तत्परता दाखवली नव्हती. मात्र, शेतकरी माल बाजारात येण्याच्या पार्श्वभूमीवर आयातीचा निर्णय घेतल्याने आता देशांतर्गत बाजारात याचा मोठा फटका उत्पादक शेतकऱ्यांना बसणार आहे.

Advertisement

शेतकरी आत्महत्या वाढवणारा हा निर्णय असून या निर्णयामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त होणार आहे. केंद्र सरकारने सोयामिल आयातीचा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी रघुनाथदादा पाटील प्रणित शेतकरी संघटनेचे युवा आघाडी जिल्हाध्यक्ष बच्चू बाबासाहेब मोढवे यांनी केली आहे.

Advertisement

सध्या खाद्यतेलाचा भाव सुमारे दीडशे ते दोनशे रुपयांपर्यंत प्रतिकिलोवर गेला. खाद्यतेलाच्या भाववाढीमुळे शेतकऱ्यांनी यावर्षी तेलबियांच्या पिकांना प्राधान्य दिले. यात प्रमुख्याने सोयाबीनचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. परंतु काढणी हंगाम जवळ येण्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने जीएम सोयामिल आयातीचा निर्णय घेतला आहे.

Advertisement
दिनांक जिल्हा कमीत कमी दर जास्तीत कमी दर सर्वसाधारण दर
13/08/2021 नागपूर 6700 7715 7200
12/08/2021 अहमदनगर 7203 7203 7203
12/08/2021 अहमदनगर 7500 8561 8500
12/08/2021 अकोला 7000 8350 8000
12/08/2021 अमरावती 8500 8750 8625
12/08/2021 अमरावती 6495 8475 7250
12/08/2021 बीड 7500 8300 8100
12/08/2021 बीड 7800 8300 8050
12/08/2021 बुलढाणा 7900 8860 8600
12/08/2021 बुलढाणा 7448 8537 8089
12/08/2021 धुळे 4000 8200 8200
12/08/2021 हिंगोली 7000 8500 7500
12/08/2021 जळगाव 8255 8255 8255
12/08/2021 जालना 5250 8150 6150
12/08/2021 लातूर 7900 9361 9250
12/08/2021 नागपूर 7300 7600 7525
12/08/2021 नागपूर 6900 8105 7850
12/08/2021 नांदेड 7400 8501 8061
12/08/2021 नाशिक 6333 8797 8677
12/08/2021 नाशिक 7801 7960 7801
12/08/2021 नाशिक 4000 8902 8650
12/08/2021 उस्मानाबाद 7500 8900 8200
12/08/2021 परभणी 9000 9500 9200
12/08/2021 वर्धा 7250 8900 8278
12/08/2021 वाशिम 7825 8753 8225
12/08/2021 वाशिम 7100 8703 8500
12/08/2021 यवतमाळ 6600 8460 7575

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply