Take a fresh look at your lifestyle.

Share Market Latest Update : आणि म्हणून सेन्सेक्सने पार केला 55 हजारांचा टप्पाही..!

मुंबई : एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक आणि टीसीएस समभागांच्या बळावर शुक्रवारी सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्सने 250 पेक्षा जास्त अंकांची वाढ नोंदवत 55,000 चा उच्चांकी आकडा पार केला. दुपारी बीएसईचा 30 शेअरचा सेन्सेक्स 258.4 अंकांच्या वाढीसह 55,102.42 च्या सर्वकालीन उच्चांकावर व्यवहार करत होता. तर, दुसरीकडे नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी सुरुवातीच्या व्यवहारात 69.80 अंक किंवा 0.43 टक्क्यांनी 16,434.20 वर होता.

Advertisement

सेन्सेक्स कंपन्यांमध्ये महिंद्रा अँड महिंद्राचा शेअर सर्वाधिक एक टक्क्यांहून अधिक वाढला. एल अँड टी, एचडीएफसी बँक, आयटीसी आणि अॅक्सिस बँक यांनीही वाढ नोंदवली. तर, दुसरीकडे टेक महिंद्रा, डॉ रेड्डीज, सन फार्मा, पॉवर ग्रिड आणि टाटा स्टीलचे शेअर्स तोट्यात बिजनेस करत होते. मागील ट्रेडिंग सत्रात सेन्सेक्स 318.05 अंक किंवा 0.58 टक्क्यांनी वाढून 54,843.98 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 82.15 अंक किंवा 0.26 टक्क्यांनी वाढून 16,325.15 वर बंद झाला. दरम्यान, आंतरराष्ट्रीय तेल बेंचमार्क ब्रेंट क्रूड 0.59 टक्क्यांनी घसरून 70.89 डॉलर प्रति बॅरलवर आले.

Advertisement
Advertisement

Leave a Reply