Take a fresh look at your lifestyle.

सरपंचांनो, काळजी घ्या बॉ.. नाहीतर होईल थेटच फौजदारी..! विरोधकांसाठीही आहे ही खास खबर..!

पुणे : ग्रामपंचायत हा लोकशाहीचा कमी आणि भ्रष्टाचाराचा पाया जास्त असेच केविलवाणे व विदारक चित्र भारतात आहे. कारण, सरपंच आणि ग्रामसेवक या ‘कर्तव्यदक्ष’ अधिकारी-पदाधिकारी यांच्या संगनमताने अनेक गावांची वाट लागली आहे. मात्र, विरोधकांनी त्यांचे कितीही भ्रष्ट गोंधळ बाहेर काढले तरीही काहीच कारवाई होत नसल्याचे अशा ठगांचे फावलेले आहे. मात्र, आता त्यालाच ब्रेक लावणारा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

Advertisement

ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहारात अनियमितता करणे, मालमत्ता व निधीचा अपहार करणे, मुळ दस्तऐवजात खोट्या व बनावट कागदपत्रांचा समावेश करणे आदी गैरप्रकार करणाऱ्या संरपंचांना आता तुरुंगाची हवा खावी लागणार असल्याची ही बातमी आहे. भ्रष्ट सरपंचांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करत अपहाराची रक्कम वसूल करण्याचे आदेश ग्रामविकास खात्याने जिल्हा परिषद व पंचायत समित्यांना दिल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत.

Advertisement

ग्रामपंचायतीत गंभीर स्वरूपाचे अपहार करण्यात येत असल्याने शासनाने आता फौजदारी कारवाईसोबतच अपहार केलेली रक्कम संबंधितांकडून वसूल करण्याचे आदेश दिले आहेत. भ्रष्टाचारास जबाबदार असणारे सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक, कर्मचारी यापैकी किंवा सर्व जण चौकशीअंती दोषी आढळल्यास संबंधित गटविकास अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Advertisement

राज्य शासनाच्या आदेशामुळे सरपंचाच्या मनमानीस आळा बसणार, भ्रष्टाचारी सरपंच व अधिकाऱ्यांसोबत पदाधिकारीही जबाबदार असणार आहे. ५० टक्के ग्रामपंचायतीत पत्नी सरपंच असून त्यांचे पतिराज कारभार पाहतात. ग्रामपंचायतीच्या कागदपत्रांसह विविध दाखल्यावर पत्नीचे नाव वापरून सरपंचांचे पती सह्या करत असल्याच्याही तक्रारी ग्रामविकास खात्याकडे आल्या आहेत. अशा या सरपंचपतींची चौकशी करण्यात येणार आहे.

Advertisement

अपहाराच्या रक्कमेत विभागीय चौकशीत गुन्हा घडल्याचा स्पष्ट निष्कर्ष निघाल्यास संबंधितांवर फौजदारीचा गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच संबंधित पंचायत समिती गटविकास अधिकाऱ्यांनी एका महिन्याच्या आत प्राथमिक चौकशी पूर्ण करणे अनिवार्य असल्याचे आदेशात स्पष्ट केले आहेत.

Advertisement
Advertisement

Leave a Reply