Take a fresh look at your lifestyle.

नर्सने केलाय मोठाच घोटाळा; करोना लसीकरण म्हणून साडेआठ हजारांना दिले ‘त्याचे’ इंजेक्शन..!

दिल्ली : कोरोनाला रोखण्यासाठी सध्या जगात सगळीकडे कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू आहे. लोक दवाखाने आणि लसीकरण केंद्रांवर जाऊन लस घेत आहेत. पण, जर्मनीत लसीकरणा दरम्यान एक अजबच प्रकार घडला आहे. येथील एका नर्सने तब्बल साडे आठ हजार लोकांना कोरोना लस म्हणून चक्क मिठाच्या पाण्याचे (सलाइन सोल्युशन) इंजेक्शन दिले. हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या नर्सने असे का केले, याचे कारण सुद्धा अजबच आहे. होय, या नर्सला कोरोना प्रतिबंधक लसींचा तिरस्कार होता. त्यामुळे हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे.

Advertisement

जर्मनीतील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये हा प्रकार घडला आहे. आता हॉस्पिटलने या सर्व लोकांनी लवकरात लवकर कोरोना प्रतिबंधक लसीकरण करावे, असे आवाहन केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या हॉस्पिटलमधील एका नर्सला सुरुवातीपासूनच कोरोना लसीवर विश्वास नव्हता. त्यानंतर अचानक बातमी आली की हॉस्पिटलच्या एका परिचारिकेने लोकांना लसीऐवजी वेगळेच इंजेक्शन दिले होते. अशा स्थितीत लोकांना पुन्हा लस घेण्यास हॉस्पिटलने सांगितले आहे.

Advertisement

द गार्डियनच्या अहवालानुसार, हे बनावट इंजेक्शन जर्मनीच्या ग्रामीण भागातील लोकांना देण्यात आले आहे. या बातमीनंतर तेथील प्राधिकरणात खळबळ उडाली. इंजेक्शन आल्यानंतर नर्स ते इंजेक्शन बदलत असे. यानंतर हे पाणी इंजेक्शनमध्ये भरून लोकांना देण्यात आले. मार्च आणि एप्रिलमध्ये अनेक लोकांना लसीकरण करण्यात आले. त्यापैकी बहुतेक वृद्ध होते. जेव्हा लसीनंतरही त्यांना पुन्हा कोरोनाने संक्रमित केले तेव्हा मात्र प्रशासन खडबडून जागे झाले. याबाबत तपासणी करण्यात आली. त्यावेळी असे दिसून आले की नर्सने इंजेक्शन बदलले आहे. या प्रकरणी आता पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply