Take a fresh look at your lifestyle.

Personal Loan घेण्यासाठी ‘हे’ आहेत महत्वाचे पर्याय; इथे व्याजदर आहे ‘इतका’ कमी..!

नाशिक : जर पैशाची गरज असेल आणि कोठूनही पैसे उधार घेण्याचा कोणताही मार्ग नसेल तर पर्सनल लोन अर्थात वैयक्तिक कर्ज घेण्याचा विचार सगळेच करतात. कारण, वैयक्तिक कर्ज मिळवणे हे आजकाल सोपे झाले आहे. जर तुमचा क्रेडिट स्कोअर फार वाईट नसेल तर, बँका आणि नॉन-बँकिंग फायनान्स कंपन्या (NBFC) वैयक्तिक कर्ज देतात. अशावेळी Personal Loan घेण्यासाठी कोणते पर्याय आहेत ते आज आपण पाहूया.

Advertisement

कर्जाच्या बाबतीत प्रथम व्याजाचा दर पाहिला जातो. याशिवाय प्रक्रिया शुल्काची देखील काळजी घेतली जाते. कर्ज घेताना प्रक्रिया शुल्क फक्त एकदाच दिले जाते. जर तुम्ही 5 लाखांपर्यंत पर्सनल लोन घेण्याचा विचार करत असाल, तर या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की तुम्ही ते कमी व्याजदराने कुठून घेऊ शकता. या अहवालात वित्तीय संस्थांचे व्याज दर आणि प्रक्रिया शुल्काबाबत तपशील देण्यात आला आहेत.

Advertisement

एसबीआय : SBI मध्ये वैयक्तिक कर्जाचा व्याज दर 9.60 टक्क्यांपासून 13.85 टक्क्यांपर्यंत सुरू होतो. 5 वर्षांच्या मुदतीसह 5 लाख रुपयांच्या कर्जासाठी ईएमआय 10525-11595 रुपये आहे. प्रक्रिया शुल्क कर्जाच्या रकमेच्या 1.5 टक्क्यांपर्यंत आहे. किंवा ते कमाल 15,000 रुपयांच्या अधीन आहे.

Advertisement

एचएसबीसी बँक : या बँकेत पर्सनल लोन 9.75 टक्के ते 15 टक्के वार्षिक व्याज दराने उपलब्ध आहे. 5 वर्षांच्या मुदतीसह 5 लाखांच्या कर्जासाठी ईएमआय 10562-11895 रुपये आहे. प्रक्रिया शुल्क कर्जाच्या रकमेच्या 1% पर्यंत आहे.

Advertisement

सिटीबँक : सिटीबँकमधील वैयक्तिक कर्जावरील व्याज दर 9.99 टक्क्यांपासून ते 16.49 टक्क्यांपर्यंत आहे. 5 वर्षांच्या मुदतीसह 5 लाखांच्या कर्जासाठी ईएमआय 10621-12290 रुपये आहे. प्रक्रिया शुल्क कर्जाच्या रकमेच्या 3% पर्यंत आहे.

Advertisement

बँक ऑफ बडोदा : येथे 10 टक्के ते 15.60 टक्के वार्षिक व्याज दराने वैयक्तिक कर्ज मिळते. 5 वर्षांच्या मुदतीसह 5 लाखांच्या कर्जासाठी ईएमआय 10624-12053 आहे. प्रक्रिया शुल्क 1000 ते 10000 रुपये आहे.

Advertisement

आयडीएफसी फर्स्ट बँक : यांचा व्याज दर 10.49 टक्क्यांपासून सुरू आहे. 5 लाखांच्या कर्जासाठी 5 वर्षांच्या कालावधीसाठी EMI 10,809 रुपयांपासून सुरू होते. प्रक्रिया शुल्क कर्जाच्या रकमेच्या 3.5% पर्यंत आहे.

Advertisement

एचडीएफसी बँक : यांचा वैयक्तिक कर्जावरील व्याज दर 10.50 टक्क्यांपासून ते 21 टक्क्यांपर्यंत आहे. 5 वर्षांच्या मुदतीसह 5 लाखांच्या कर्जासाठी ईएमआय 10747-13527 रुपये आहे. प्रक्रिया शुल्क कर्जाच्या रकमेच्या 2.5% पर्यंत आहे, जास्तीत जास्त 25,000 रुपयांच्या अधीन आहे.

Advertisement

आयसीआयसीआय बँक : यांचा व्याज दर 10.50 टक्क्यांपासून ते 19 टक्क्यांपर्यंत आहे. 5 वर्षांच्या कालावधीसह 5 लाखांच्या वैयक्तिक कर्जासाठी ईएमआय 10747-12970 रुपये आहे. प्रक्रिया शुल्क कर्जाच्या रकमेच्या 2.50 टक्क्यांपर्यंत आहे.

Advertisement

कोटक महिंद्रा बँक : यांचे पर्सनल लोन दरवर्षी 10.75% ते 24% पर्यंत व्याज दराने उपलब्ध आहे. 5 लाखांच्या कर्जासाठी 5 वर्षांच्या कालावधीसाठी ईएमआय 10809-14384 रुपये आहे. प्रक्रिया शुल्क कर्जाच्या रकमेच्या 2.5% पर्यंत आहे.

Advertisement

टाटा कॅपिटल : येथे वैयक्तिक कर्जावरील व्याज दर 10.99 टक्क्यांपासून सुरू होतो. 5 लाखांच्या कर्जासाठी 5 वर्षांच्या कालावधीसाठी ईएमआय 10869 रुपयांपासून सुरू होते. प्रक्रिया शुल्क कर्जाच्या रकमेच्या 2.75 टक्क्यांपर्यंत आहे.

Advertisement

कोटक महिंद्रा बँकेत डिजिटल पर्सनल लोनची सुविधा उपलब्ध आहे. डिजिटल पर्सनल लोनसाठी व्याज दर 10.50% p.a पासून सुरू होतो. विविध बँका आणि बिगर बँकिंग वित्त कंपन्यांकडून वैयक्तिक कर्जासाठी नमूद केलेले व्याज दर आणि प्रक्रिया शुल्क 9 ऑगस्ट 2021 रोजी एकत्रित केलेल्या डेटावर आधारित आहेत. त्यांचा स्रोत paisabazaar.com आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply