Take a fresh look at your lifestyle.

अरे.. लागा की तयारीला.. सोमवारपासून ‘त्या’ 16 जिल्ह्यात होणार पावसाचे पुनरागमन..!

पुणे : राज्यात पाऊस पुन्हा गायब झाला आहे. अनेक जिल्ह्यात दिवसभर ढगाळ हवामान असते. मात्र, पाऊस होत नाही. अशी परिस्थिती आहे. त्यामुळे तापमामात सुद्धा वाढ झाल्याचे दिसून आले आहे. देशभरात 15 ऑगस्टपर्यंत पाऊस पडण्याची फारशी शक्यता नाही, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने दिला आहे. त्यानंतर मात्र देशातील अनेक राज्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे, असे विभागाने सांगितले होते.

Advertisement

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्हे वगळता अन्य जिल्ह्यात अद्याप समाधानकारक पाऊस पडलेला नाही. आता तर पाऊसच नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आता हवामान खात्याने पुन्हा पावसाबाबत अंदाज दिला असून 16 जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला आहे. आता हवामान खात्याने राज्यातील 16 जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला आहे. यांसह राज्यातील आणखी काही जिल्ह्यात पाऊस होणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

Advertisement

चालू आठवड्यात विकेंडनंतर राज्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. यावेळी हवामान विभागाने राज्यातील जवळपास 16 जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला आहे. हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार सोमवारी 16 ऑगस्ट रोजी कोल्हापूर, सांगली, सातारा, लातूर, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होईल. याच दिवशी पुणे, नगर, औरंगाबाद आणि जालना या चार जिल्ह्यात विजांचा कडकडाट होणार आहे. यानंतर मंगळवारी सुद्धा अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे असे हवामान विभागाने म्हटले आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply