Take a fresh look at your lifestyle.

शेतीकर्जमाफीऐवजी जाहिरातबाजीवर १६० कोटींची उधळपट्टी..! महाविकास आघाडीवर पाचपुतेंची दणक्यात टीका

अहमदनगर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राणा भीमदेवी थाटात राज्यातील संकटग्रस्त शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याची गर्जना विधिमंडळात करूनही दीड वर्षात शेतकऱ्यांना काहीही मदत झालेली नाही. शेतकऱ्याच्या पदरात कर्जमाफी पडलीच नसताना महाविकास आघाडी सरकारने तब्बल १६० कोटींची उधळपट्टी खोट्या जाहिरातींवर केल्याची टीका भाजपचे आमदार बबनराव पाचपुते यांनी केली आहे.

Advertisement

पाचपुते म्हणाले की, महाराष्ट्रातील सर्वात लबाड सरकार म्हणून ठाकरे सरकारची नोंद इतिहासात होणार आहे. खंडणीखोरी आणि भ्रष्टाचारामुळे महाराष्ट्र रसातळाला चालला असताना कोविडचे कारण सांगत जनतेस घरात डांबून ठेवले जात आहे. हे स्वतःची कातडी वाचवण्याचे सरकारचे कारस्थान आता उघड झाले आहे. खोट्या जाहिरातींवर १६० कोटींची उधळपट्टी करण्याऐवजी १५० कोटी रुपये कर्जमाफीला दिले असते, तर संकटग्रस्त शेतकऱ्यास दिलासा मिळाला असता.

Advertisement

Advertisement

त्यांनी पुढे म्हटले आहे की, केवळ शब्दांची आतषबाजी करणाऱ्या ठाकरे सरकारने शेतकऱ्यांच्या फसवणुकीत आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. अतिवृष्टी, वादळांसारख्या संकटात अगोदरच भरडलेल्या शेतकऱ्यास मदतीचा हात देण्याऐवजी स्वतःच्या जाहिरातबाजीवरच उधळपट्टी करून ठाकरे सरकारने शेतकऱ्यास उद्ध्वस्त केले आहे. राज्यातील दीड लाख शेतकरी कुटुंबांना या फसवणुकीचा फटका बसत असताना ठाकरे सरकार मात्र, पाहणी दौऱ्याच्या नावाखाली मर्सिडीझमधून पर्यटन करण्यात दंग आहे.

Advertisement

कर्जबाजारी शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी आणि नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत लाभ देण्याची घोषणा डिसेंबर २०१९ मध्ये मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली होती. त्यावर कोणतीच कार्यवाही, तर नाहीच, उलट त्यानंतर वादळ, अतिवृष्टीसारख्या संकटामुळे समस्यांमध्ये भर पडूनही सरकारने मात्र शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले, अशी टीका पाचपुतेंनी केली आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply