Take a fresh look at your lifestyle.

मोदी सरकारच्या निर्णयाने सगळेच चक्रावले; बंदी असलेल्या शेतमालास भारताचे दरवाजे खुले केले..!

मुंबई : केंद्र सरकारने खरीप हंगामाच्या तोंडावर १५ लाख टन जेनेटिक मॉडिफाइड (जीएम) सोयामील आयातीचा निर्णय घेतला आहे. त्याचे परिणाम बाजारात दिसण्यास सुरुवात झाली आहे. वर्षभरात व्यापाऱ्यांनी शेतकरी सोयाबीनवर पैसे दुप्पट किंवा तिप्पट केले त्यावेळी केंद्र सरकारने अशी तत्परता दाखवली नव्हती. मात्र, शेतकरी माल बाजारात येण्याच्या पार्श्वभूमीवर आयातीचा निर्णय घेतल्याने आता देशांतर्गत बाजारात याचा मोठा फटका उत्पादक शेतकऱ्यांना बसणार आहे.

Advertisement

मुळात देशात जेनेटिक मॉडिफाइड (जीएम) सोयाबीन लागवडीवर बंदी आहे. अशावेळी केंद्र सरकारने सोयाबीनचे भाव कमी करण्यासाठी चक्क थेट अशा बंदी असलेल्या जीएम सोयामिल आयातीस हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे जर अशा पिकांची लागवड करणे घातक आहे, तर मग इतर देशात उत्पादित असा शेतमाल भारतात आणून तो सामान्य नागरिकांना खाऊ घालणे कितपत योग्य आहे, असाच कळीचा मुद्दा यानिमित्ताने उपस्थित झालेला आहे.

Advertisement

आता काहीच दिवसात पुन्हा जोरात सोयाबीन आवक बाजारात होणार असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने सोयामिल आयातीला हिरवा कंदील दाखवून या पिकाचे भाव 7 हजार रुपये प्रतिक्विंटलवर आणलेले आहेत. अवघ्या पाचच दिवसात नागपूरसह अनेक बाजार समितीत भाव किमान 30 टक्के कमी झालेले आहेत. शेतकरी आत्महत्या वाढवणारा हा निर्णय असून या निर्णयामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त होणार आहे. केंद्र सरकारने सोयामिल आयातीचा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी रघुनाथदादा पाटील प्रणित शेतकरी संघटनेचे अहमदनगर जिल्हा युवा आघाडी जिल्हाध्यक्ष बच्चू बाबासाहेब मोढवे यांनी केली आहे.

Advertisement

त्यांनी पुढे म्हटले आहे की, सध्या खाद्यतेलाचा भाव सुमारे दीडशे ते दोनशे रुपयांपर्यंत प्रतिकिलोवर गेला. खाद्यतेलाच्या भाववाढीमुळे शेतकऱ्यांनी यावर्षी तेलबियांच्या पिकांना प्राधान्य दिले. यात प्रमुख्याने सोयाबीनचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. परंतु काढणी हंगाम जवळ येण्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने जीएम सोयामिल आयातीचा निर्णय घेतला आहे. पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता उपजतच रोग प्रतिरोधक क्षमता व एकरी सरासरी ३० क्विटंल उत्पादन असलेले जीएम बियाणे वापरण्यास भारतीय शेतकऱ्यास बंदी घातली. दुसरीकडे परदेशी शेतकऱ्याने जीएम बियाणे वापरून पिकवलेले सोयाबीन आयात करून भारतीय शेतकऱ्यास मारक असा निर्णय सरकारने घेतला.

Advertisement
Advertisement

Leave a Reply