Take a fresh look at your lifestyle.

म्हणून हर्बल टीने करा दिवसाची सुरुवात; पहा कोणते फायदे मिळतील तुम्हाला

आपल्याकडे चहा किंवा कॉफी घेऊन दिवसाची सुरुवात करण्याची पद्धतच पडली आहे. चहा घेणे जणू काही सवयीचाच भाग बनला आहे. त्यामुळे हर्बल टी ने देखील दिवसाची सुरुवात केल्यास ते जास्त फायदेशीर ठरेल. कारण, आपले आरोग्य चांगले राहण्याच्या दृष्टीने हर्बल टी फायदेशीर आहेत. यामुळे कोणतेही दुष्परिणाम होत नाही. हर्बल टी आपल्या पाचन तंत्रासाठी फायदेशीर आहे. तसेच वजन कमी करण्यात देखील याची मदत होते.

Advertisement

ग्रीन टी मध्ये न्यूट्रिशन आणि अँटीऑक्सिडेंट घटक असतात. ज्यामुळे शरीराचे वाढलेले वजन आटोक्यात येते आणि लठ्ठपणा कमी होतो. तसेच ‘ग्रीन टी’ ही त्वचेसाठीही उत्तम मानली जाते. त्यामुळे वजन कमी होते. वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी सोबतच नियमित व्यायामही गरजेचा असतो.

Advertisement

ग्रीन टी तयार करण्यासाठी पाणी जास्त गरम करण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे त्यातील आवश्यक जीवनसत्वे नष्ट होतात. लेमन टी’ सुद्धा आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. ‘लेमन टी’ नियमित घेतल्यास फायदेशीर ठरू शकते. जर रोगप्रतिकारक शक्ती चांगली नसेल, तर हवामान बदलल्यामुळे लोकांना त्रास होऊ लागतो. अशा लोकांना हिवाळ्यात ताप, सर्दी, खोकला येणे असे त्रास उद्भवू शकतात. यावर आले आणि लिंबू घातलेला चहा गुणकारी ठरतो. आले-लिंबूयुक्त चहा या समस्यांपासून आपले संरक्षण करतो आणि आपली रोगप्रतिकार शक्ती सुधारतो.

Advertisement
Advertisement

Leave a Reply