Take a fresh look at your lifestyle.

अर्र.. चीनच्या ‘त्या’ खेळीने जगापुढे नवेच संकट; पहा नेमका काय बट्ट्याबोळ केलाय मुजोर देशाने

दिल्ली : अवघ्या जगात आरोग्य, बिजनेस आणि सामरिक क्षेत्राचे संकट उभे करणाऱ्या चीनमुळे सगळेच देश हैराण आहेत. मुजोर असलेल्या या देशाने आता भारत आणि अमेरिकेसह अवघ्या जगापुढे आणखी नवा पेच निर्माण केला आहे. त्यामुळे आता सामरिक क्षेत्रात पुढे काय होणार याचीच चर्चा सुरू झाली आहे.

Advertisement

अफगाणिस्तानमध्ये तालिबानच्या रक्तरंजित खेळाचा जगभरातून तीव्र निषेध केला जात आहे. परंतु अशावेळी चिनी ड्रॅगन आणि पाकिस्तान या दोन देशांनी तालिबानचे राज्य आल्यास त्याला मान्यता देण्याची तयारी केली असल्याच्या बातम्या येत आहेत.  चीनच्या या हालचालीमुळे अमेरिकेच्या बायडेन प्रशासनाला मोठा धक्का बसू शकतो.  अमेरिका सध्या हिंसाचाराला प्रतिसाद म्हणून तालिबानवर कठोर निर्बंध लादण्याचा विचार करत आहे. तथापि, जगाला दाखवण्यासाठी म्हणून शांतता करारासाठी चीनने तालिबानवर जाहीरपणे “दबाव” टाकला आहे.

Advertisement

यूएस न्यूजच्या अहवालानुसार, जर तालिबानचे दहशतवादी अफगाणिस्तानवर कब्जा करण्यात यशस्वी झाले तर चीन त्यांना मान्यता देण्यास तयार आहे. या अहवालात अमेरिकेच्या गुप्तचर सूत्रांचा हवाला देत म्हटले आहे की, चीनला घनी सरकार आणि तालिबान यांच्यात समझोता हवा आहे. परंतु, चीनच्या नवीन लष्करी आणि गुप्तचर मूल्यांकनानंतर कम्युनिस्ट पक्षाचे नेते आता तालिबानशी औपचारिक संबंध सुरू करण्यास तयार आहेत. अफगाणिस्तानमधील जमीनीचे आणि राजकीय वास्तव पाहता, असेच होण्याची शक्यता अनेकांना वाटत आहे.

Advertisement

तालिबान्यांनी रक्तरंजित हल्ले करून कंधारसह देशातील बरीच मोठी शहरे ताब्यात घेतली आहेत. असे असताना चीनने आता आपले धोरण बदलली आहे. आता तालिबानी दहशतवादी देशाची राजधानी काबुलच्या दिशेने खूप वेगाने जात आहेत. अफगाणिस्तान-चीनची सीमा आता तालिबानच्या ताब्यात आहे. चिनी खेळीसह आता कतारमधील तालिबानवर दबाव आणण्याची अमेरिकेची रणनीती देखील अपयशी ठरत आहे. त्यामुळे अवघ्या जगाची डोकेदुखी वाढली आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply