Take a fresh look at your lifestyle.

चीनच तो..! मित्रालाही सोडेल कसा..? पहा काय फसवणूक केलीय मित्रदेश पाकिस्तानची..!

दिल्ली : दैनिक सन या वृत्तपत्रानुसार सन 1999 मध्ये चीन आणि पाकिस्तानने जेएफ 17 या विमान निर्मितीसाठी एक करार केला होता. अन्य फायटर विमानांच्या तुलनेत ही विमाने दर्जेदार असल्याचे सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र, ही विमाने खूपच तकलादू असल्याचे दिसून आले आहे. या विमानांमध्ये आरडी-93 एयरो इंजिन आहेत. त्यामुळे ही विमाने काळा धूर सोडतात. त्यामुळे ही विमाने एखाद्या युद्ध प्रसंगात अगदी सहजपणे शत्रूच्या निशाण्यावर येऊ शकतात. असे दिसत असल्याने पाकिस्तानने याबाबत चीनकडे अनेक वेळा तक्रारी केल्या. यानंतर चीनने विमानांचे इंजिन बदलले मात्र, त्याचा काहीच फायदा झाला नाही.

Advertisement

संपूर्ण जगावर राज्य करण्याच्या विचारात असलेल्या आणि तशाच पद्धतीने कारवाया करणाऱ्या चीनमुळे आता त्याचे मित्र देश सुद्धा हैराण झाले आहेत. कारण, चीनने मित्र आहे म्हणून या देशांना त्रास द्यायचा नाही, असे काही ठरवलेले नाही. स्वार्थी चीनने या देशांनाही सोडलेले नाही. चीनच्या या बनवाबनवीचा मोठा फटका पाकिस्तानला बसल्याचे आता समोर आले आहे. चीनने आपली जेएफ 17 थंडर या फायटर विमाने पाकिस्तानला दिली. पाकिस्तानने सुद्धा कोणताही विचार न करता विमाने घेतली. आता मात्र हीच विमाने पाकिस्तानसाठी डोकेदुखी ठरत आहेत.

Advertisement

आपली फसवणूक झाल्याचे स्पष्ट दिसत असले तरी काहीच बोलण्याची हिम्मत पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांमध्ये नाही. कारण, चीनने आधीच अब्जावधींचे कर्ज पाकिस्तानला दिले आहे. या कर्जाचे मोठे ओझे या देशावर आहे. त्यामुळे चीनने आता काही केले तरी पाकिस्तानला काहीच करता येणार नाही, हे नक्की आहे. चीनने दिलेल्या या विमानांच्या इंजिनमध्ये खराबी, देखभाल दुरुस्तीसाठी कोट्यवधींचा खर्च आणि खालावत असलेली विमानांची कार्यक्षमता यामुळे पाकिस्तानी एअर फोर्ससाठी ही विमाने आता अडचणीची ठरत असल्याचे समोर आले आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply