Take a fresh look at your lifestyle.

आणि चीनी पडले तोंडघशी; पहा करोनाच्या मुद्द्यावर नेमका काय खेळ चालू होता या मुजोर देशाचा

दिल्ली : मुजोरी आणि खोटेपणा यात जगामध्ये सर्वात बेक्कार देश असलेल्या चीनचा आणखी एक खोटेपणा उघडकीस आलेला आहे. चक्क वास्तवात नसलेल्या व्यक्तीचा हवाला देऊन चिनी माध्यमे अनेक दिवस खोट्या बातम्या प्रकाशित करत राहिली आहेत. मात्र, नंतर खोटे उघड झाल्यानंतर त्यांनी माफी मागितली आहे. करोनाच्या जागतिक संकटाच्या मुद्द्यावर या देशाने असे दुष्कृत्य करून दाखवले आहे.

Advertisement

चीनमध्ये व्हायरल होत असलेल्या अनेक सोशल मीडिया पोस्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कोरोनाचे मूळ शोधण्यासाठी एक सल्लागार गट तयार केला आहे. यामध्ये सहभागी स्विस जीवशास्त्रज्ञ विल्सन एडवर्ड्सने तपासाविरोधात निवेदन दिले आहे. विल्सनची फेसबुक पोस्ट चीनी वृत्तपत्रात प्रकाशित झाली आहे. आघाडीच्या चिनी वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित झालेल्या या बनावट बातम्यांनुसार, विल्सनने फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली होती. यामध्ये त्यांनी कोरोनाच्या उत्पत्तीवरील तपासाला राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचे वर्णन केले. ते म्हणाले की याचा वापर चीनच्या विरोधात केला जात आहे आणि ते याबद्दल खूप चिंताग्रस्त आहेत.

Advertisement

चिनी माध्यमांमध्ये ट्विटचा स्क्रीनशॉट व्हायरल झाल्यानंतर स्विस दूतावास समोर आला आणि असा कोणीही व्यक्ती अस्तित्वात असल्याचे नाकारले. दूतावासाने सोशल मीडियावर म्हटले आहे की, स्वित्झर्लंडमध्ये या नावाचा एकही माणूस नाही. आम्ही खूप शोध घेतला, पण विल्सन एडवर्ड्स नावाच्या व्यक्तीच्या नावाची कोणतीही नोंदणी किंवा लेख सापडला नाही. तुमच्याकडे त्यांचा तपशील असल्यास शेअर करा. आम्ही त्याला भेटू इच्छितो. मात्र, तशी शक्यता नाही.

Advertisement

स्वित्झर्लंडने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, आम्ही चीनच्या लोकांना या बनावट बातम्यांबद्दल सांगत आहोत. आमच्याकडे या नावाने कोणताही जीवशास्त्रज्ञ नाही. आम्ही लोकांना आग्रह करतो की ही फेक न्यूज काढून टाका. सीजीटीएन, पीपल्स डेली आणि चायना डेलीने ही बातमी प्रसिद्ध केली होती. सरकारी मालकीच्या आणि हुकुमशाही सरकारच्या मार्गदर्शनाखाली अशा पद्धतीच्या बातमी जगभरात अनेक देशात प्रसिद्ध होत असतात. त्यामुळे जनतेची दिशाभूल करून राजकारण करण्याचा हा डाव किती जीवघेणा असू शकतो हेच वास्तव यानिमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झालेले आहे.

Advertisement

Advertisement

Leave a Reply