Take a fresh look at your lifestyle.

मोदी सरकारचा महिला बचतगटांना मदतीचा हात..! कोट्यवधीचा निधी देणार, पाहा काय आहे याेजना..?

नवी दिल्ली : देशातील महिला बचतगटाच्या माध्यमातून  सक्षम झाल्या आहेत. विविध उद्योग-व्यवसायाच्या माध्यमातून आजची महिला स्वत:च्या पायावर उभी राहिली आहे. या महिला वर्गाला अधिक सक्षम बनविण्यासाठी, त्यांच्या प्रगतीसाठी मोदी सरकारने पुढाकार घेतला आहे. त्यांच्यासाठी काही सरकारी योजना सुरु केल्या आहेत. त्या माध्यमातून देशभरातील विविध वयोगटातील, विविध ठिकाणच्या महिला एकमेकींसोबत जोडल्या गेल्या आहेत.

Advertisement

देशातील महिला बचत गटही गेल्या काही महिन्यांमध्ये विशेष सक्रीय झाले आहेत. आता या बचतगटांना अधिक बळ देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 1625 कोटी रुपयांचा फंड जारी करणार आहेत. देशातील 4 लाख बचत गटांमधील महिलांसाठी ‘आत्मनिर्भर नारी-शक्ति से संवाद’ या कार्यक्रमात आज (ता. 12) दुपारी 12.30 वाजता पंतप्रधान मोदी या महिलांच्या खात्यात पैसे पाठवणार आहेत.

Advertisement

कोरोना संकटात बचतगटातील महिलांनी मोलाची कामगिरी पार पाडली. मास्क, सॅनिटायझर ते अन्नपदार्थ बनवून त्याचे अनेक गरजूंपर्यंत वाटप करण्याचे काम त्यांनी केले. त्याद्वारे स्वत:लाही सक्षम करण्यास मदत झाली.

Advertisement

पंतप्रधान मोदी आज देशातील 4 लाख बचतगटांना 1625 रुपयांचा मदतनिधी जारी करणार आहेत. शिवाय ते PMFME (Pradhan Mantri Formalisation of Micro food processing Enterprises) अंतर्गत येणाऱ्या 7,500 बचतगटांना 25 कोटींची आरंभिक रक्कम देखील जारी करणार असल्याचे मिनिस्ट्री ऑफ फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीजतर्फे सांगण्यात आले.

Advertisement

दरम्यान, याच कार्यक्रमात 75 एफपीओ (शेतकरी उत्पादन संघटना) ना 4.13 कोटींची रक्कम प्रदान केली जाणार आहे. हा कार्यक्रम 12.30 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून हाेणार आहे. बचतगटांशी जोडल्या गेलेल्या महिलांशी पंतप्रधान मोदी संवाद साधणार असल्याची माहिती देण्यात आली.

Advertisement

एटीएममध्ये पैसे नसल्यास बॅंकांवर होणार दंडात्मक कारवाई, रिझर्व्ह बॅंकेचा मोठा निर्णय, ग्राहकांची गैरसोय टळणार..
अर्र.. पाकिस्तानवर कोसळलेय ‘तेही’ भयंकर संकट; पहा काय परिस्थिती ओढवलीय शेजारी देशात

Advertisement
Advertisement

Leave a Reply