Take a fresh look at your lifestyle.

अहो आश्चर्यम..! मागील 25 दिवसांपासून पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर..! कच्च्या तेलाचे दर घसरुनही ग्राहकांना दिलासा नाही..

नवी दिल्ली : पेट्रोल-डिझेलच्या (Petrol and Diesel Price) दरवाढीमुळे हैराण झालेल्या नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रोज दराचे नवनवे विक्रम करणाऱ्या पेट्रोल-डिझेलचे भाव मागील 25 दिवसांपासून स्थिर आहेत. त्यात आजही (गुरुवारी) कोणताही बदल झालेला नाही.

Advertisement

दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत (Crude Oil Price) सध्या मोठी घसरण झाली आहे. मात्र, त्यानंतरही पेट्रोल-डिझेलचे दर कमी झालेले नाहीत.  मुंबईमध्ये पेट्रोलचे दर 107.83 रुपये प्रति लिटर, तर डिझेलचे दर 97.45 रुपये प्रति लिटर आहेत.

Advertisement

पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मे महिन्यात सातत्याने वाढ झाल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र, त्यानंतर आता 25 दिवसांत पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. त्याआधी 42 दिवस झालेल्या इंधनवाढीबाबत बोलायचे झाले, तर पेट्रोल जवळपास 11.52 रुपये प्रति लिटरने महागले होते, तर डिझेल 9.08 रुपये प्रति लिटरने महागले होते.

Advertisement

पेट्रोल-डिझेलच्या किंमती दररोज सकाळी 6 वाजता जाहीर होतात. नवीन दर सकाळी 6 वाजेपासून लागू होतात. पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत अबकारी शुल्क, डिलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी चलनांच्या आधारावर आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये कच्च्या तेलाच्या किंमती काय आहेत, या आधारावर रोज पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल होत असतात.

Advertisement

प्रमख शहरांतील इंधनदर (प्रति लिटर)
दिल्ली – पेट्रोल 101.84, डिझेल- 89.87 रुपये
मुंबई – पेट्रोल 107.83 रुपये, डिझेल 97.45 रुपये
चेन्नई – पेट्रोल 101.49 रुपये, डिझेल 94.39 रुपये
कोलकाता – पेट्रोल 102.08 रुपये, डिझेल 93.02 रुपये
भोपाळ – पेट्रोल 110.20 रुपये, डिझेल 98.67 रुपये

Advertisement

बंगळुरु – पेट्रोल 105.25 रुपये, डिझेल 95.26 रुपये
लखनऊ -पेट्रोल 98.92 रुपये, डिझेल 90.26 रुपये
पाटणा – पेट्रोल 104.25 रुपये, डिझेल 95.57 रुपये
जयपूर – पेट्रोल 108.71 रुपये, डिझेल 99.02 रुपये

Advertisement

असे तपासा पेट्रोल-डिझेलचे नवे दर
आता रोज बदलणारे पेट्रोल-डिझेलचे नवे दर एसएमएस (SMS)च्या माध्यमातून जाणून घेता येणार आहेत. देशातील HPCL, BPCL आणि IOC या तीन तेल विपणन कंपन्या सकाळी 6 नंतर पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जारी करतात. नवीन दरांसाठी आपण वेबसाइटला भेट देऊन माहिती मिळवू शकता. तसेच मोबाइलवर SMS द्वारेही दर तपासता येतात. त्यासाठी 92249 92249 या क्रमांकावर SMS पाठविल्यास नवे दर जाणून घेता येतील.

Advertisement

इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल. तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. आयओसीएलच्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल.

Advertisement

मोदी सरकारचा महिला बचतगटांना मदतीचा हात..! कोट्यवधीचा निधी देणार, पाहा काय आहे याेजना..?
एटीएममध्ये पैसे नसल्यास बॅंकांवर होणार दंडात्मक कारवाई, रिझर्व्ह बॅंकेचा मोठा निर्णय, ग्राहकांची गैरसोय टळणार..

Advertisement
Advertisement

Leave a Reply