Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. MPCB व MIDC मध्ये एजंटगिरी जोमात; पहा उद्योजक कसे गेलेत कोमात..!

नाशिक : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ या दोन संस्था म्हणजे राज्याच्या औद्योगिक व सर्वांगीण विकासातील प्रमुख अडथळा आहेत. त्याचाच प्रत्यय छोट्या-मोठ्या उद्योजकांना वेळोवेळी येत असतो. MIDC ने उद्योगाची तर, MPCB ने पर्यावरणाची पुरती वाट लावण्याचा ठेका घेतला आहे. नाशिक येथील ज्येष्ठ उद्योजक जयप्रकाश जाेशी यांनी हा महत्वाचा मुद्दा उपस्थित केले आहे. मैत्रीच्या बैठकीत हा मुद्दा मांडण्यात आलेला आहे.

Advertisement

महाराष्ट्र अाैद्याेगिक ट्रेड अॅन्ड इन्व्हेस्टमेंट फॅसिलिटीशन सेलचे (मैत्री) अध्यक्ष हर्षदीप कांबळे यांच्याकडे तक्रार करून त्यांनी महाराष्ट्र राज्यातील उद्योजकांची कैफियत मांडली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ अाणि एमआयडीसीच्या नाशिक येथील प्रादेशिक कार्यालयांमध्ये सर्रासपणे एजंटगिरी सुरू असल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला आहे. एजंटांमार्फत गेलेली कामेच या दोन्ही कार्यालयांत केली जातात. अन्यथा उद्योजकांना हाकलून लावले जात असल्याची तक्रार त्यांनी केलेली आहे. महाराष्ट्र राज्यात सगळीकडे असेच चित्र आहे.

Advertisement
बैठकीत मांडलेले महत्वाचे मुद्दे असे :
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व महाराष्ट्र अाैद्याेगिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांची अाैद्याेगिक क्षेत्रावर प्रचंड दहशत अाहे
दाेन्ही मंडळांकडून उद्याेजकांना त्रास दिला जाताे
एमअायडीसीने नागरिकांची सनद म्हणून फलक लावलेला अाहे. मात्र, या फलकाप्रमाणे कामेच हाेत नसल्याने ताे फलक तरी कशाला पाहिजे?
प्रदूषण नियंत्रण मंडळ म्हणजे आमचे मालक अाहेत का?
या दोन्ही विभागांनी असे केल्यास अाैद्याेगिक विकास कसा हाेणार?

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply