Take a fresh look at your lifestyle.

मनी इज लाईफ समजणाऱ्यांसाठी महत्वाची माहिती; पहा लव्हसाठी नेमके काय महत्वाचे आहे जिंदगीत

पुणे : मनी इज लाईफ आणि लव्ह नाही तर पैसा महत्वाचा मानणाऱ्या मंडळींना धक्का देणारी ही महत्वाची बातमी आहे. कारण, प्रेमळ नातेसंबंध तुटण्यामागे पैसा हे एक कारण असू शकते, परंतु या विषयावरील एक नवीन अभ्यास दुसऱ्या बाजूकडे लक्ष देतो. नवीन संशोधन म्हणते की जे लोक आपली कमाई आणि पैशावर लक्ष केंद्रित करतात ते संबंध मजबूत करण्यात अयशस्वी ठरतात.

Advertisement

अशा लोकांना त्यांच्या जोडीदाराची साथ मिळत नाही. परिणामी त्यांचे मार्ग वेगळे होतात. मिशिगन आणि टेक्सास विद्यापीठातील संशोधकांनी संयुक्तपणे हे संशोधन केले आहे. त्यामुळे जीवनात फ़क़्त पैसा आणि यश हेच सर्वस्व मानणाऱ्या महाभागांना हा मोठा झटका आहे. या संशोधनात सहभागी 434 लोकांपैकी 74 टक्के लोकांना डायरी देण्यात आल्या. ही डायरी 6 आठवड्यात भरण्यास सांगितले होते. या डायरीत दर आठवड्याला काही प्रश्नांची उत्तरे लिहायला सांगितली गेली. संशोधनातून असे दिसून आले की जेव्हा जेव्हा एखाद्या जोडीदाराला अधिक पैसे कमवण्याची इच्छा दिसली तेव्हा त्यांच्या जोडीदाराने त्यांना मनापासून साथ दिली नाही.

Advertisement

संशोधनात जे विवाहित आहेत, नातेसंबंधात आहेत किंवा दीर्घकाळापासून जोडीदारासोबत राहत आहेत असे लोक होते. त्यांच्याशी बोलून हे समजून घेण्याचा प्रयत्न केला गेला की किती वेळा ते त्यांच्या जोडीदाराशी जमले नाहीत. म्हणजेच, गोष्टींवर सहमती झाली नाही. या व्यतिरिक्त, संशोधनात सामील असलेल्या लोकांना एकतर एक लेख वाचण्यासाठी देण्यात आला. ज्यामध्ये आर्थिक यशाबद्दल बोलले गेले. किंवा एक लेख देण्यात आला ज्यामध्ये असे म्हटले आहे की आर्थिक यशामुळे जीवनमानावर परिणाम होत नाही

Advertisement

संशोधकांना वाद आणि पैशाचा संबंध सापडला. त्यांचा असा विश्वास आहे की जे लोक पैसे कमावण्यावर अधिक लक्ष केंद्रित करतात ते कदाचित त्यांच्या जोडीदाराच्या गरजांकडे लक्ष देऊ शकत नाहीत. हे वेगळे होण्याचे कारण आहे. मिशिगन येथील सहाय्यक प्राध्यापक आणि मानसशास्त्रज्ञ डेबोरा ई वार्ड यांच्या मते, जेव्हा एखादी व्यक्ती आर्थिक यशाला आपली प्राथमिकता बनवते तेव्हा हे घडते.

Advertisement

Advertisement

Leave a Reply