Take a fresh look at your lifestyle.

पर्यटन इन्फो : बाब्बो.. म्हणून त्या बेटाला नाव पडले गाय टेकडी..! पहा गावरान गायांच्या दुनियेची सफर

दिल्ली : राजस्थान राज्याच्या चित्तौड़गढ जिल्ह्यातील राणा प्रताप सागर धरणाच्या मध्यभागी असलेले बेट अमेझॉनच्या जंगलासारखे दिसते. इथले लोक त्याला गाय टेकडी म्हणतात. हे संपूर्ण बेट दाट झाडांनी झाकलेले आहे. यामध्ये असलेला एक सुंदर तलाव बेटाचे सौंदर्य वाढवत आहे. इथे गेल्यावर अमेझॉनच्या जंगलाचाच फील येतो.

Advertisement

हे बेट रावतभटापासून सुमारे 40 किमी दूर आहे. येथे जाण्यासाठी गाडीने सिंगडिया गावात पोहचल्यावर पुढे चिखल असल्याने ट्रॅक्टरच्या मदतीने जावे लागते. राणा प्रताप सागर धरणाचे पाणलोट क्षेत्र लगत आहे. तेथून स्टीमरमध्ये बसून 10 किमीचा प्रवास करावा लागतो. जेव्हा स्टीमर राणा प्रताप महासागराच्या मध्यभागी होते, तेव्हा असे वाटत होते की आपण काही महासागराच्या मध्यभागी आहोत.

Advertisement

Advertisement

जसजसे बेटाजवळ जातो तसतसा उत्साह आणि उत्सुकता वाढते. बेटावर अनेक वन्य प्राणी आहेत. मगर या प्राण्यापासून इथे काळजी घ्यावी लागते. येथे मगर किनाऱ्यांवर आढळू शकतात. यासह, या दाट बेटावर विषारी साप आणि अजगरदेखील आहेत. 40 मिनिटांच्या प्रवासानंतर बेटाच्या किनाऱ्यावर पोहोचतो. बेटावर पोहोचताच पक्ष्यांचा आवाज ऐकू येतो.

Advertisement

1953 मध्ये जेव्हा राणा प्रताप सागर धरणाचे काम सुरू झाले. तेव्हा त्याच्या परिघात येणारी गावे दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आली. हे ठिकाणसुद्धा एक गाव होते. जवळच मातसरा गाव होते जे पूर्णपणे पाण्याखाली गेले होते. पण हे गाव पाण्याच्या आगमनाने बेटात बदलले. त्या काळात काही गायी इथेही राहिल्या. त्या तिथेच वाढल्या. आता येथे गायींची संख्या खूप जास्त झाली आहे. येथे सध्या किती गाई आहेत हे सांगणे कठीण आहे. कारण त्यांची मोजणी कधीच झालेली नाही.

Advertisement

आता येथेही आता गायींची संख्या वाढू लागली. म्हणून या बेटाचे नाव ‘गाय टेकडी’ असे पडले आहे. आजही येथे शेकडो गायी आहेत. ज्या सामान्य गावरान गाईंपेक्षा आकाराने मोठ्या असतात. या बेटाच्या काठावर पक्षी अभयारण्यासारखी हालचाल आहे. त्यामुळे गोवा पक्षी अभयारण्यात गेल्याचा फील येतो.

Advertisement
Advertisement

Leave a Reply