Take a fresh look at your lifestyle.

एटीएममध्ये पैसे नसल्यास बॅंकांवर होणार दंडात्मक कारवाई, रिझर्व्ह बॅंकेचा मोठा निर्णय, ग्राहकांची गैरसोय टळणार..

मुंबई : अनेकदा एटीएममध्ये पैसे नसल्यास ग्राहकांना या एटीएमवरुन त्या एटीएमवर, असे दारोदार भटकण्याची वेळ येते. काही वेळा सलग सुट्या आल्यास दोन दोन दिवस एटीएममध्ये खडखडाट असतो. आता डिजिटल बॅंकिंगचे प्रमाण वाढले असले, तरी काही ठिकाणी कॅश द्यावी लागते. अशा वेळी खिसा रिकामा असल्यास खरेदी करता येत नाही.

Advertisement

ग्राहकांची होणारी परवड लक्षात घेऊन, भारतीय रिझर्व्ह बँकेने एक महत्त्वाचा आदेश जारी केला आहे. त्यामुळे ग्राहकांना कॅश-आऊट्स एटीएमपासून, तसेच त्यामुळे होणाऱ्या त्रासापासून मुक्ती मिळणार आहे.

Advertisement

भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) सर्व बँका आणि व्हाईट लेबल एटीएम ऑपरेटर्सना एटीएममध्ये वेळोवेळी पैसे भरण्याचे निर्देश दिले आहेत. जेणेकरून एटीएममध्ये पैसे नसल्यामुळे ग्राहकाची होणारी गैरसोय टळणार आहे. तसेच एटीएममध्ये पैसे नसल्यास संबंधित बँकेला दंडाला सामोरे जावे लागणार आहे.

Advertisement

ग्राहकांना एटीएममधून अविरत पैसे मिळावा, यासाठी रिझर्व्ह बँकेने हा निर्णय घेतला आहे. त्यानुसार एटीएममध्ये १० तासांहून अधिक वेळ ठणठणाट असल्यास संबंधित बँकेवर वा व्हाईट लेबल एटीएम ऑपरेटर्स कंपन्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. याबाबत रिझर्व्ह बँकेने बँकांना आणि कंपन्यांना निर्देश दिले आहेत. येत्या १ ऑक्टोबर २०२१ पासून ही नियमावली लागू होणार आहे.

Advertisement

अनेकदा सलग सुट्ट्या, रोखतेची चणचण किंवा रोकड व्यवस्थापन करणाऱ्या कंपन्यांच्या व्यस्त कार्यक्रमामुळे एटीएममध्ये खडखडाट दिसून येतो. मुख्य शहरे सोडली, तर निमशहरी आणि ग्रामीण भागात चार चार दिवस एटीएममध्ये रोकडची बोंब असते. त्यामुळे ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याचे रिझर्व्ह बँकेच्या निदर्शनास आले आहे.

Advertisement

एटीएमचे व्यवस्थापन अधिक काटेकोरपणे व्हावे, यासाठी थेट दंडात्मक कारवाईची नियमावली रिझर्व्ह बँकेने तयार केली आहे. बँकांनी आणि व्हाईट लेबल एटीएम ऑपरेटर्स कंपन्यांनी एटीएममधील रोकड व्यवस्थापन, चलन भरणा, याबाबत योग्य नियोजन करण्याचे निर्देश दिले आहेत.

Advertisement

एका महिन्यात १० तासांहून अधिकवेळ ATM रोकड नसल्यास संबंधित बँकेला १०००० रुपये प्रती ATM मशीन असा दंड आकारला जाणार आहे. एखाद्या व्हाईट लेबल ATM मधील रोकड नसल्यास या ATM ला रोकडा पुरवठा करणाऱ्या मुख्य बँकेवर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे रिझर्व्ह बँकेने म्हटलं आहे..

Advertisement

सोन्याच्या दरात घसरण सुरुच, अमेरिकी डाॅलरला मजबूती, बाजारातील स्थिती जाणून घेण्यासाठी वाचा..
मोबाईलच्या दुष्परिणामाने मुलांवर झालाय असाही दुष्परिणाम; पहा नेमके काय म्हटलेय संशोधन अहवालात

Advertisement
Advertisement

Leave a Reply