Take a fresh look at your lifestyle.

राम शिंदे दिल्लीला गेले अन विखेंनाही शह देऊन आले..? पहा नेमके कोणते कार्य केलेय त्यांनी

अहमदनगर : जिल्ह्याच्या राजकारणात सध्या शांत असलेले माजी पालकमंत्री राम शिंदे यांनी पुन्हा एकदा वातावरण तापवले आहे. कारण, दिल्ली भेटीच्या निमित्ताने ते पुन्हा एकदा बातम्यांमध्ये झळकत असून नगर-पुणे महामार्गावरील तब्बल १०० किलोमीटर तीनमजली उड्डाणपूल बांधण्याच्या बातमीत त्यांचे नाव झळकत आहे.

Advertisement

भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे आणि ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील हेही सध्या दिल्लीत आहेत. मात्र, त्याचवेळी शिष्टमंडळातील नगरचे माजी पालकमंत्री राम शिंदे, भाजपचे माजी गटनेते सुवेंद्र गांधी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन तीनमजली पुलाच्या तत्वत: मंजुरीस हिरवा कंदील मिळवला आहे. एकूणच यामुळे शिंदे हे पुन्हा एकदा राजकीयदृष्ट्या सक्रीय होत असल्याचा संदेश मिळाला आहे. मात्र, या भेटीतून विखे पिता-पुत्रांना का बाजूला ठेवण्यात आले, असाही प्रश्न दबक्या आवाजात विचारला जात आहे.

Advertisement

नगरच्या बायपासपासून ते चंदननगरपर्यंत पूल या तीन मजली उड्डाणपुलाच्या कामाला ७,२०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. याबाबत माहिती देताना शिंदे यांनी दिव्य मराठीला म्हटले आहे की, या उड्डाणपुलासाठी सविस्तर प्राथमिक अहवाल मागून घेणार तसेच उड्डाणपुलाची निविदा लवकरच काढणार असल्याचे आश्वासन केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी दिले. यामुळे नगर-पुणे रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होईल. गडकरी भूमिपूजनासाठी येणार आहेत.

Advertisement

पुणे-नगर असा भारतातील पहिलाच हा १०० किलोमीटर लांबीचा तीनमजली पूल असणार आहे. याचा प्राथमिक सविस्तर अहवाल तयार करण्याचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत खासगी संस्थेला देण्यात येणार आहे. अहवालानंतर निविदा प्रक्रियेला वेग येईल. तोपर्यंत म्हणजे हा पूल पूर्ण होईपर्यंत औरंगाबाद-पुणे या प्रवासात नागरिकांची होणारी ससेहोलपट कायम राहणार आहे.

Advertisement

Advertisement

Leave a Reply