Take a fresh look at your lifestyle.

अर्र.. पाकिस्तानवर कोसळलेय ‘तेही’ भयंकर संकट; पहा काय परिस्थिती ओढवलीय शेजारी देशात

दिल्ली : भारताचा कुरापतखोर शेजारी पाकिस्तान सध्या स्वतःच्याच जाळ्यात पुरता अडकला आहे. दाहशतवादास खतपाणी घालून अन्य देशांना त्रास देण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचे मोठेच नुकसान झाले आहे. गरिबी, बेरोजगारी, अन्न धान्याचे संकट अशा एक ना अनेक संकटांचा सामना संध्या हा देश करत आहे. तर दुसरीकडे देशाची अर्थव्यवस्था सुद्धा डबघाईस आली आहे. त्यामुळे कर्ज घेऊन अर्थव्यवस्थेस आधार देण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, या प्रयत्नात पाकिस्तान पुरता कंगाल झाला आहे. देशाकडे पैसे तर नाहीतच आता पाण्याचाही दुष्काळ निर्माण होत चालला आहे.

Advertisement

आज पाकिस्तानमधील अनेक शहरात लोकांना त्यांच्या गरजेच्या तुलनेत अत्यंत कमी प्रमाणात पाणी मिळत आहे. देशातील पाण्याची टंचाई पाहता या समस्येवर तोडगा काढला गेला नाही तर भविष्यात देशात भीषण दुष्काळाचे संकट निर्माण होईल, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. पाकिस्तान सरकारने दिलेल्या अहवालातच ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. पाकिस्तान काउंसिल ऑफ रिसर्च वॉटर रिसोर्सेसने देशातील 29 शहरांतील पाणीयोजनांचा अभ्यास केला. विशेष म्हणजे, या पाणीयोजनांतील पाण्याच्या नमुन्यांची तपासणी केली असता यातील 20 पाणीयोजनांतील जवळपास 50 टक्के पाणी नमुने वापरास योग्य नसल्याचे दिसून आले आहे. देशात प्रति व्यक्त पाण्याची उपलब्धता 400 टक्क्यांनी कमी झाली आहे. सन 2025 मध्ये पाण्याचे संकट आधिक गंभीर होणार आहे. पाऊस होत नसल्याने देशात पाणी टंचाईचे संकट आधिकच बिकट होत चालले आहे.

Advertisement

दरम्यान, पाकिस्तानमध्ये पाण्याच्या संकटावर लवकरच मार्ग काढला नाही तर भीषण दुष्काळ पडेल असा इशारा जलतज्ज्ञांनी दिला होता. हा इशारा आता खरा ठरत आहे. एका रिपोर्ट मध्ये असे म्हटले होते, की दरवर्षी खरीप आणि रब्बी हंगामात पिकांसाठी पुरेसे पाणी सुद्धा मिळत नाही. यावेळी जवळपास 45 टक्के पाण्याची कमतरता असते. आज देशातील अनेक मोठ्या शहरात भूगर्भातील पाण्याची पातळी कमी होत आहे. त्यामुळे जल तज्ज्ञांनी असा इशारा दिला आहे, की आगामी काळात जर नवीन जलाशय तयार केले नाहीत आणि पाण्याचा अपव्यय टाळला गेला नाही तर देशात भीषण दुष्काळ निर्माण होण्याचा धोका आहे. देशाची वाढती लोकसंख्या, हवामानातील बदल आणि पाण्याचा अपव्यय या काही महत्वाच्या समस्या आहेत, आगामी काळात याकडे अधिक लक्ष देण्याची आवश्यकता असून जर सतर्क राहिलो नाही दुष्काळाच्या संकटास कोणीही रोखू शकत नाही, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.

Advertisement

Advertisement

Leave a Reply