Take a fresh look at your lifestyle.

म्हणून अमेरिका भडकलीय चीनवर; भारताकडे अध्यक्षपद असल्याने चर्चेकडे लागले जगाचे लक्ष

मुंबई : सध्या यूएनएससीचे अध्यक्षपद भारताकडे आहे. या बैठकीत अमेरिकेने दक्षिण चीन समुद्रात चीनच्या वाढत्या कारवाया पाहून इशारा दिला. तर चीनने सुद्धा प्रत्युत्तर देत दक्षिण चीन समुद्र परिसरात शांती आणि स्थिरतेसाठी अमेरिकेने सर्वात मोठा धोका निर्माण केला आहे, असा आरोप केला. तसेच फिलिपिन्सच्या बाजूने न्यायाधिकरणने दिलेला निर्णय सुद्धा बेकायदेशीर असल्याचे चीनचे उपराजदूत दाई बिंग यांनी सांगितले.

Advertisement

अमेरिकेचे विदेश मंत्री एंटनी ब्लिंकेन यांनी सांगितले, की दक्षिण चीन समुद्रात सध्या अनेक बेकायदेशीर कारवाया सुरू आहेत. तसेच समुद्रावर आपलाच हक्क असल्याचा दावा करण्याचे प्रकार येथे सातत्याने घडत आहेत. त्यानंतर चीनने सुद्धा संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. दाई बिंग यांनी सांगितले, की येथे सध्या परिस्थिती स्थिर आहे. समुद्री सुरक्षेच्या मुद्द्यावर बोलण्याचा काहीही अधिकार अमेरिकेला नाही, असे सुनावले.

Advertisement

जागतिक राजकारणात सध्या अमेरिका आणि चीन या दोन देशात वाद वाढत चालला आहे. कोरोना विषाणूच्या उगमच्या मुद्द्यावर अमेरिकेने चीनची चांगलीच कोंडी केली आहे. तसेच आता अन्य प्रकरणात सुद्धा दोन्ही देशात सातत्याने तणाव निर्माण होत आहे. सध्याच्या परिस्थितीत दक्षिण चीन समुद्रात चीनची दादागिरी वाढली आहे. या परिसरात असणाऱ्या लहान देशांना चीन धमकावत आहे. तसेच या समुद्रावर कब्जा करण्याचा त्याचा डाव आहे. मात्र, येथील अन्य देशांशी चीनचा हा डाव ओळखला असून त्यास विरोध सुरू केला आहे. यामध्ये अमेरिका सुद्धा या देशांना मदत करत आहे. त्यामुळे चीन आणि अमेरिकेत तणाव वाढत चालला आहे. आताही संयुक्त राष्ट्रांच्या एक बैठकीत या मुद्द्यावर चीन आणि अमेरिकेत जोरदार शाब्दिक वाद पाहण्यास मिळाले.

Advertisement

दरम्यान, कोरोना विषाणूच्या उगमाच्या मुद्द्यावर अमेरिकेने चीनची चांगलीच कोंडी केली आहे. कोरोना वायरस वुहान प्रयोगशाळेतुनच लीक झाल्याचा दावा केला जात आहे, काही शास्त्रज्ञांनी तसे पुरावे सुद्धा मिळाले असल्याचे सांगितले आहे. जगभरातील विविध संस्थांचे जे अहवाल येत आहेत, त्यातही हा विषाणू प्रयोगशाळेतूनच पसरल्याची शक्यता व्यक्त केली गेली आहे, तसे आरोपही चीनवर सातत्याने होत आहेत. अमेरिकेने तर एक पाऊल पुढे टाकत या विषाणूचा ठावठिकाणा हुडकून काढण्याचे आदेश आपल्या गुप्तचर संस्थांना दिले आहेत.

Advertisement

Advertisement

Leave a Reply