Take a fresh look at your lifestyle.

अर्र.. हे काय होऊन बसले आता..? करोनासह ‘हाही’ झटका मानवजातीला बसलाय की

मुंबई : जगभरात सध्या कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटने थैमान घातले आहे. डेल्टा व्हेरिएंट सर्वाधिक घातक ठरला असतानाच आता इतर अनेक आजार दाखल झालेले आहेत. कोरोनाच्या आडून दुसरे आजार वाढत चालले आहेत. त्यापैकीच एक आजार म्हणजे न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर. हा आजार काही दिवसांपासून वाढत चालला आहे. तसेच कामामध्ये उत्साह न वाटणे आणि जीवनात विरक्ती आली असे वाटणाऱ्या नागरिकांमध्येही वाढ होत आहे.

Advertisement

द लेंसेट ग्लोबल हेल्थ जर्नलमध्ये प्रसिद्ध केलेल्या अहवालात आरोग्य तज्ज्ञांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे. सध्या देशात तीन प्रकारचे न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरचे रुग्ण आढळत आहेत. 1999 ते 2019 वीस वर्षांच्या काळात रुग्णांची संख्या दुपटीने वाढली आहे. एका संशोधनानुसार छत्तीसगड, ओदिशा, आसाम, पश्चिम बंगाल आणि त्रिपुरा यांसारख्या राज्यात स्ट्रोकचे रुग्ण आढळत आहेत. तर केरळ सारख्या राज्यांमध्ये अल्जायमर्सचे रुग्ण आढळत आहेत. काही दुखापत झाल्यानंतर न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर येण्याचे प्रकार तामिळनाडू, जम्मू काश्मीर, लद्दाख, केरळ आणि गोवा या राज्यात सर्वाधिक आढळून आले आहेत.

Advertisement

आजच्या धावपळीच्या जमान्यात आरोग्याबाबत अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. आहाराच्या वेळा पाळल्या जात नाहीत आणि लाइफस्टाइल मध्ये बदल झाल्याने या समस्या जास्तच वाढल्या आहेत. फास्टफूड आणि जंकफूडच्या सवयीमुळे पौष्टिक आहार मिळत नाही, यामुळे सुद्धा अनेक आजारांना आमंत्रण मिळत आहे. ताण तणावाने सुद्धा यात भर घातली आहे. आजच्या लाइफस्टाइलमध्ये बदल झाल्याने सुद्धा देशात या आजाराचे रुग्ण वाढत चालले आहेत.

Advertisement

दरम्यान, सध्या स्मरणशक्ती कमी होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. वैज्ञानिक भाषेत यास डीमेंशिया असे म्हणतात. वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांचा असा अंदाज आहे, की 2050 पर्यंत डिमेंशियाचे रुग्ण जगभरात तिप्पट होतील. अशा रूग्णांची संख्या 15 कोटींपेक्षा जास्त होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Advertisement

Advertisement

Leave a Reply