Take a fresh look at your lifestyle.

आय्योव.. सापडलाय ‘त्याही’ विषाणूचा रुग्ण; वाचा 88 टक्के डेथ रेट असलेल्या या घातक विषाणूची माहिती

मुंबई : आज अवघ्या जगास कोरोना महामारीच्या भयानक संकटाचा सामना करावा लागत आहे. कोरोनाचा धोका अजूनही कायम असून आता तर नव्या व्हेरिएंटने अनेक देशांना जबरदस्त तडाखा दिला आहे. कोरोनाचे संकट कमी म्हणून की काय यानंतर अनेक नवे विषाणू जगात दाखल झाले आहेत. याआधी अमेरिकेत मंकीपॉक्सचा रुग्ण सापडला होता. त्याआधी चीनमध्ये बर्ड फ्लूचा रुग्ण सापडला होता. त्यानंतर आता पुन्हा एका नव्या व्हायरसने एन्ट्री घेतली आहे. या अतिशय घातक विषाणूचे नाव ‘मारबर्ग’ व्हायरस असे असून हा विषाणू पश्चिम आफ्रिकेतील गिनी या देशात या आजाराचा पहिला रुग्ण सापडला आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही या विषाणूचा रुग्ण सापडल्याचे म्हटले आहे.

Advertisement

हा विषाणू ‘इबोला’ या व्हायरसशी संबंधित असल्याचे सांगण्यात येत आहे. मारबर्ग विषाणू सुद्धा घातक असल्याने वैज्ञानिकांचे टेन्शन वाढले आहे. या व्हायरसमुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण 88 टक्के इतके आहे. आरोग्य संघटनेचे निदेशक डॉ. मात्शिदिसो मोएती यांनी सांगितले, की या विषाणूमध्ये दूरपर्यंत फैलावण्याची क्षमता आहे. त्यामुळे या विषाणूस लवकरात लवकर नियंत्रणात आणणे अत्यंत गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे, दोन महिन्यांपूर्वीच आरोग्य संघटनेने गिनी या देशात इबोला विषाणूची दुसरी लाट आटोक्यात आल्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता मारबर्ग हा विषाणू दाखल झाला आहे. या विषाणूमुळे संक्रमित रुग्णास या विषाणूने कसे संक्रमित केले, याचा शोध घेण्यात येत आहे. या आजाराची लक्षणे कशी आहेत, हा विषाणू कसा फैलावू शकतो, या विषाणूपासून कसे सुरक्षित राहिल, याची सविस्तर माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे.

Advertisement

याआधी चीनमध्ये मंकी बी हा विषाणू सापडला होता. हा विषाणू माकडांद्वारे आल्याचे सांगण्यात येत आहे. या विषाणूने संक्रमित लोकांमध्ये मृत्युदर 70 ते 80 टक्के आहे. कोरोना काळात हा नवा विषाणू आल्याने चीनमध्ये खळबळ उडाली आहे. बीजिंग शहरातील एक पशु अधिकारी मंकी बी व्हायरसने संक्रमित असल्याचे आढळून आले होते. या अधिकाऱ्याचा नंतर मृत्यू झाला. याआधी चीनमध्ये या विषाणूने संक्रमित प्रकरणांबाबत स्पष्टता नव्हती. त्यामुळे या पशु वैद्यकीय अधिकाऱ्यासच मंकी बी व्हायरसने संक्रमित पहिला रुग्ण मानण्यात येत आहे. या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या अन्य लोकांची तपासणी केली असता त्यांचे तपासणी अहवाल मात्र निगेटीव्ह आले आहेत.

Advertisement

Advertisement

Leave a Reply