Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. करोना रोखण्यात अपयश आलेल्या अधिकाऱ्यांवर चक्क कारवाई..! पहा कुठे घडलेय हे आक्रीत

पुणे : भारतात करोना कसा आला यावर चर्चा करताना तो कोणाच्या हलगर्जीपणामुळे आला आणि फोफावला यावरही अनेकदा चर्चा झाली आहे. केंद्र सरकार अमेरिकन ट्रम्पतात्यांना नमस्ते करीत असतानाच हवाई मार्गाने करोना देशात आल्याकडे काँग्रेस पक्षासह अनेकांनी वेळोवेळी लक्ष वेधले आहे. तसेच करोना रोखताना सगळी जबाबदारी नागरिकांवर टाकून केंद्र आणि राज्य सरकार हातावर हात देऊन बसल्याचे भारतीयांनी अनेकदा अनुभवले आहे. मात्र, देशभरात एकही अधिकारी किंवा सरकारमधील जबाबदार मंत्र्यांवर करोना काळात हलगर्जीपणा किंवा कर्तव्याकडे दुर्लक्ष केले म्हणून कारवाई भारतात झालेली नाही. सगळेच नेते, सरकारी यंत्रणा व अधिकारी-कर्मचारी यासाठी सामान्य नागरिकांना जबाबदार धरून नामानिराळे राहिले आहेत. दरम्यान, करोना रोखण्यात अपयश आल्याने अधिकाऱ्यांवर चक्क कारवाई झाल्याची बातमीही आली आहे.

Advertisement

जिथून जगभरात करोना फैलावाला असे म्हटले जाते त्या चीनमध्ये सध्या अशा कारवाईची धडाका सुरू झाला आहे. नागरिकांना दोषी ठरवून नामानिराळे राहण्याची पळवाट तेथील सरकारने अजिबात ठेवलेली नाही. मात्र, तरीही तेथील जबाबदार म्हणवून घेतल्या जाणाऱ्या राष्ट्राध्यक्ष आणि मंत्रिमंडळ यांनी याची जबाबदारी घेतलेली नाही. हेही दुर्दैव चीनी नागरिकांचे आहेच की. कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे जगातील अनेक देश पुन्हा कोरोनाच्या संकटात ओढले गेले आहेत. चीनमध्ये सुद्धा डेल्टा व्हेरिएंटने थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. येथे अनेक प्रांतात रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे.

Advertisement

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी चीनने कठोर निर्बंध लागू केले आहेत. काही शहरात कठोर लॉकडाऊन केले आहे. इतकेच नाही तर कोरोना रोखण्यात हलगर्जीपणा करणाऱ्या काही अधिकाऱ्यांवर प्रशासनाने कारवाई सुद्धा केली आहे. नियमांचे पालन करण्याबाबतीत चीनचे धोरण कठोर आहे. त्याचा फटका आता या अधिकाऱ्यांना बसला आहे. चीनमधील यांग्जो शहरात मोठ्या प्रमाणात अयोग्य पद्धतीने कोरोना तपासण्या करण्यात आल्या. या प्रकारास संबंधित पाच अधिकाऱ्यांना जबाबदार याच अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे कोरोना वेगाने पसरल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. सध्या हे शहर कोरोना हॉटस्पॉट बनले आहे. तसेच जवळच्या शहरांमध्ये सुद्धा कोरोनाचे संक्रमण वाढत चालले आहे. चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार देशभरात 30 अधिकारी, महापौर, स्थानिक स्वास्थ्य निदेशक तसेच दवाखाने आणि विमानतळ प्रमुख अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.

Advertisement

चीनच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या प्रांतात कोरोनाचे रुग्ण सापडल्यानंतर आता कोरोनचा सर्वात पहिला रुग्ण सापडलेल्या वुहान शहरात पुन्हा कोरोना परतला आहे. या शहरात कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढत असल्याने खळबळ उडाली आहे. कोरोनाचा धोका पाहता प्रशासनाने तत्काळ कठोर निर्बंध लागू केले आहेत. तसेच जास्तीत जास्त लोकांची कोरोना तपासणी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार या शहरातील तब्बल 1.12 कोटी लोकांची कोरोना तपासणी आरोग्य विभागाने केली आहे. या शहरात 2019 मध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता त्यानंतर हा घातक आजार जगभरात पसरला. शुक्रवारपर्यंत वुहान मध्ये एकूण 47 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. या शहरात 4 ऑगस्टपासून कोरोना तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे.

Advertisement

Advertisement

Leave a Reply