Take a fresh look at your lifestyle.

‘त्या’ 11 जिल्ह्यांना ‘येलो’ अलर्ट; पहा कोणत्या भागात होणार आहे दमदार पाऊस

मुंबई : राज्यात पावसाने पुन्हा ओढ दिली आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात जोरदार बरसल्यानंतर पाऊस गायब झाला आहे. त्यानंतर आता पुन्हा पावसासाठी अनुकूल वातावरण तयार होत आहे. हवामान विभागाने सुद्धा काही जिल्ह्यात पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. हवामान खात्याने विदर्भात येलो अलर्ट जारी केला आहे. विदर्भातील जिल्ह्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल, असा अंदाज आहे.

Advertisement

राज्यातील नागपूर, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, अकोला या 11 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. जुलैच्या शेवटच्या आठवड्यापासून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात कमी प्रमाणात पाऊस होत आहे. त्यामुळे पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे.

Advertisement

राज्यात पुढील आठ दिवसात पावसाची फारशी शक्यता नाही. काही दिवसांपूर्वी कोकण आणि दक्षिण महाराराष्ट्रात जोरदार पाऊस पडला. त्यामुळे येथील काही जिल्ह्यात पाणीच पाणी दिसत होते. तर दुसरीकडे राज्यात अन्य जिल्ह्यात पाऊसच नव्हता. तसेच मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात जुलैमध्ये जोरदार पाऊस पडलेला नाही.

Advertisement

देशात सर्वत्र मान्सूनचा पाऊस होत आहे. सुरुवातीस जोरदार बरसल्यानंतर आता मात्र पाऊस गायब झाला आहे. अनेक शहरात अशी परिस्थिती आहे. त्यामुळे वातावरणात पुन्हा उष्णता वाढत चालली आहे. शनिवारी दिल्लीत जास्तीत जास्त 33.2 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद घेण्यात आली होती. त्यामुळे येथे दिवसाचे तापमानात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. देशात अनेक ठिकाणी आता पावसाने विश्रांती घेतली आहे. ज्या ठिकाणी मुसळधार पाऊस पडत होता तेथेही आता पावसाचा जोर कमी पडला आहे.

Advertisement

Advertisement

Leave a Reply