Take a fresh look at your lifestyle.

सोन्याच्या दरात घसरण सुरुच, अमेरिकी डाॅलरला मजबूती, बाजारातील स्थिती जाणून घेण्यासाठी वाचा..

नवी दिल्ली : स्वस्तात सोन्याची खरेदी करणाऱ्यांसाठी (Gold Rate) एक खूशखबर आहे. सोन्याचे दर गेल्या चार महिन्याच्या निच्चांकी पातळीवर पोहोचले आहेत. अमेरिकी डॉलर सध्या मजबूत झाल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत घसरली आहे. परिणामी, आपल्याकडेही सोन्याचे दर कमी झाल्याचे दिसून येत आहे. मात्र, काही काळापुरतीच ही घसरण होत असून, आगामी काळात सोन्याच्या दरात मोठी वाढ होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Advertisement

दरम्यान, मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) गेल्या तीन सत्रात सोन्याचे दर जवळपास 1.3 टक्क्यांनी घसरुन 46,000 रुपये प्रति तोळ्यापेक्षा कमी झाले होते. गेल्या चार महिन्यातील ही निच्चांकी दर आहे. तसेच चांदीचे दरही 1.5 टक्क्यांनी कमी झाले. मंगळवारी दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे दर 176 रुपयांनी कमी झाले होऊन 45,110 रुपये प्रति तोळा झाले होते.

Advertisement

चांदीचे दरही 898 रुपये प्रति किलोने कमी होऊन 61,715 रुपये प्रति किलोवर पोहोचले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 1,735 डॉलर प्रति औंस असून, चांदीचे दर 23.56 डॉलर प्रति औंस होते. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये सोन्याचे दर 56200 रुपये प्रति तोळा होते. त्या तुलनेत विचार केल्यास सध्या सोन्याचा दर 11000 रुपयांनी स्वस्त असल्याचे दिसते.

Advertisement

सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी सध्याचा कालावधी चांगला आहे. तज्ज्ञांच्या मते, सध्या केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते. वर्षाअखेरपर्यंत गुंतवणूकदारांना सोन्यातून चांगला रिटर्न मिळणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. गेल्यावर्षी सोन्याने 28 टक्के रिटर्न दिला होता. त्याआधीच्या वर्षी सोन्याने 25 टक्के रिटर्न दिला होता.

Advertisement

दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी सोने सुरक्षित आणि चांगला पर्याय आहे. गुड रिटर्न्स वेबसाइटच्या मते आज दिल्लीमध्ये सोन्याचे दर 45,500 रुपये प्रति तोळा आहेत. मुंबईमध्ये दर प्रति तोळा 45,280 रुपये रुपये असून चेन्नईमध्ये 43,730 रुपये आहेत.

Advertisement

मोबाईलच्या दुष्परिणामाने मुलांवर झालाय असाही दुष्परिणाम; पहा नेमके काय म्हटलेय संशोधन अहवालात
उज्ज्वला योजनेचे लाॅंचिंग, मोदी सरकारकडून गरीब कुटुंबाना मोफत गॅस कनेक्शन, कसा करणार अर्ज..?

Advertisement
Advertisement

Leave a Reply