Take a fresh look at your lifestyle.

आय्योव.. म्हणून त्याने १५० दिवसात बदलले चक्क १५०० सीमकार्ड..! पहा नेमका काय आहे हा घोटाळा

पुणे / नाशिक : एकेकाळी अवघ्या महाराष्ट्रात आणि देशभरात हातपाय पसरण्याच्या बातम्यांमुळे किंवा जाहिरातींमुळे चर्चेत आलेली भाईचंद हिराचंद रायसाेनी (बीएचअार) पतसंस्था सध्या आर्थिक घोटाळ्याच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. याप्रकरणी मुख्य अाराेपी सुनील देवकीनंदन झंवर (रा.जयनगर, जळगाव) यास नाशिक येथून पुणे अार्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक करण्यात यश मिळवले आहे. भाजपचे कार्यक्षम नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय म्हणून झंवर याचे नाव चर्चेत अाले हाेते.

Advertisement

अार्थिक गुन्हे शाखेच्या पाेलिस उपायुक्त भाग्यश्री नवटक्के यांनी झंवर यांच्या अटकेची माहिती दिलेली आहे. पतसंस्थेशी संबंधित मालमत्तेचा व पैशांचा गैरव्यवहार करण्याकरिता अाराेपींनी संगनमताने बनावट वेबसाईट तयार करून मागील तारखेत नाेंदी करता येणारे सॉफ्टवेअर बनवून कर्जदारांची कर्ज प्रकरणे बेकायदेशीररीत्या निरंक केल्याचे हे प्रकरण आहे. झंवर व त्याच्या फर्मच्या नावे पतसंस्थेच्या मालमत्ता वर्ग करून ६१ काेटी ९० लाख ८८ हजार रुपयांपर्यंत गैरव्यवहार केल्याचे हे प्रकरण आहे.

Advertisement

अटकेपासून बचावासाठी झंवरने पाच महिन्यात दीड हजारपेक्षा जास्त वेळा सिमकार्ड, माेबाइल, वायफाय डाेंगल बदलून पोलिसांना झुलवत ठेवल्याचे पुढे आलेले आहे. झंवरच्या जळगाव येथील कार्यालयावरील छाप्यातून पुणे अार्थिक गुन्हे शाखेला माेठया प्रमाणात कागदपत्रे व इलेक्ट्राॅनिक डाटा मिळाला आहे. आज बुधवारी झंवर याला पुण्याच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. पुण्यातील सायबर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रवींद्र गवारी व पोलिस नाईक शिरीष गावडे या दोघांच्या पथकाने झंवर याचा पाठलाग करून त्याला अटक केली आहे.

Advertisement

मागील नऊ ते दहा महिन्यांपासून झंवर नाशिक, मुंबई, गुजरात, राजस्थान, दिल्ली, मध्य प्रदेश अशा विविध ठिकाणी वेशांतर करून आणि सिमकार्ड बदलून फिरत होता. पोलिस इंदोरलाही पोहचले. तेथे एका माजी मंत्र्यांच्या घरात तो राहत असल्याचे निष्पन्न झाले.

Advertisement

Advertisement

Leave a Reply