Take a fresh look at your lifestyle.

मोबाईलच्या दुष्परिणामाने मुलांवर झालाय असाही दुष्परिणाम; पहा नेमके काय म्हटलेय संशोधन अहवालात

मुंबई : आजच्या धावपळीच्या जमान्यात योग्य आहाराकडे दुर्लक्ष होत आहे. आहाराच्या वेळा पाळल्या जात नाहीत. फास्टफूड आणि जंकफूडचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे आज लठ्ठपणाच्या समस्येने आज अनेक लोक हैराण झाले आहेत. शहरी भागात तर हा त्रास अधिकच वाढत चालला आहे. यामुळे ताण तणावात सुद्धा वाढ झाली आहे. तसेच जगभरातील लहान मुलांमध्ये लठ्ठपणाची समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे.

Advertisement

याबाबत युनिव्हर्सिटी ऑफ हेलसिंकी आणि अन्य एका संशोधन संस्थेने अभ्यास केला. या अभ्यासात शाळेत जाणाऱ्या लहान मुलांमध्ये डिजिटल मिडियाचा जास्त उपयोग आणि किशोर अवस्थेतील लठ्ठपणा यांच्यात काय संबंध आहे, याबाबत माहिती घेण्यात आली. लहानपणापासून जी मुले डिजिटल मीडियाचा जास्त वापर करतात अशी मुलांना किशोर अवस्थेत लठ्ठपणाच्या समस्येचा सामना करावा लागत असल्याचे दिसून आले. नियमित व्यायाम केल्याने या समस्येवर मात करता येऊ शकते असेही यावेळी दिसून आले. जी मुले आठवड्यातून सहा तास व्यायाम किंवा विविध प्रकारच्या खेळांमध्ये सहभागी होतात अशा मुलांमध्ये लठ्ठपणाची समस्या निर्माण होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात कमी होते.

Advertisement

सध्या वाढत्या वजनाची समस्या अनेकांना जाणवत आहे. आहाराच्या वेळा पाळल्या जात नाहीत. फास्ट फूडचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पौष्टिक आहार मिळणे सुद्धा दुरापास्त झाले आहे. लहान मुलांमध्ये सुद्धा लठ्ठपणाच्या समस्या निर्माण होत आहेत. कोरोना काळात लॉकडाऊनमुळे लहान म़ुलांमध्ये मोबाइल वापराचे प्रमाण वाढले आहे. सध्या शाळा सुद्धा ऑनलाइन सुरू आहेत. तसेच अन्य  वेळी सुद्धा टिव्ही आणि मोबाइलचा वापर वाढला आहे. त्याचा परिणाम म्हणून अनेक समस्या निर्माण होत आहेत. तसेही आताच्या तंत्रज्ञानाच्या जमान्यात लहान मुलांमध्ये डिजिटल मिडिया वापराचे प्रमाण वाढले आहे. आता तर अहवालांतूनही असेच सांगण्यात येत आहे. त्यामुळे या महत्वाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष करता कामा नये.

Advertisement

Advertisement

Leave a Reply