Take a fresh look at your lifestyle.

शिक्षकाच्या त्रासाने ग्रामस्थ हैराण; ‘त्या’ अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी दिले झेडपीला निवेदन

अहमदनगर : मनमानी करणाऱ्या शेटेला पाठीशी घालणाऱ्या नगर तालुका पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी सोनार यांच्यावर दप्तर दिरंगाई कायद्यांतर्गत कारवाई करण्यात यावी, अशी मागणी तक्रारदार तुकाराम गेरंगे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे. त्यामुळे गट शिक्षणाधिकारी सोनार यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचे दिसून येत आहे.

Advertisement

याबाबत माहिती अशी की, इसळक (ता. नगर) येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक धोंडीबा जबाजी शेटे यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तुकाराम गेरंगे यांनी १० डिसेंबर २०२० रोजी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली होती. याप्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) शिवाजी शिंदे यांच्याकडून चौकशी अहवाल मागविला आहे. त्यांनी सदर चौकशी करणे कामी पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी सोनार यांना वारंवार पत्र व्यवहार करून चौकशी अहवाल सादर करण्याबाबत लेखी सूचना केल्या आहेत.

Advertisement

तरी देखील त्यांनी कोणताही अहवाल अद्याप सादर केलेला नाही. तक्रारदार तुकाराम गेरंगे यांनी शेटे यांच्यावर कारवाईसाठी अनेकदा पाठपुरावा केला. मात्र, सोनार यांनी मनमानी करणाऱ्या शेटेला पाठीशी घालण्याचा प्रकार चालविला आहे. यातून उद्विग्नतेतून गेरंगे यांनी सोनार यांच्यावर कारवाई करण्याबाबत २६ जुलै ला मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन दिले आहे.

Advertisement

प्राथमिक शिक्षक शेटे याच्याबद्दल नेमकी तक्रार काय : इसळक येथील जिल्हा परिषद शिक्षक शेटे धोंडीबा यांना बडतर्फ करण्याची मागणी ग्रामस्थ आणि शिक्षण समिती अध्यक्ष तुकाराम गेरंगे यांनी केली आहे. शेटे वेळेत शाळेवर येत नाहीत. मनमानी पद्धतीने वागून विद्यार्थ्यांचे शालेय नुकसान करत आहेत. कोरोना काळात शाळेत विलगीकरण कक्षाची जबाबदारी दिलेली असतानाही बेजबाबदारपणे गैरहजर राहिले आहेत. शिवाय प्रशासनातील वरिष्ठांना माहिती अधिकाराची भीती दाखवून धमकावण्याचा अनेकदा प्रकार केला आहे. त्यामुळे कारवाईला भीत नसल्याचे सांगून ग्रामस्थांशी असभ्य व गैरव्यवहार करत असल्याचा आरोप करत शेटेला तात्काळ सेवेतून कायमस्वरूपी निलंबित करण्यात यावे अशी मागणी केली असल्याचे तक्रारदार तुकाराम गेरंगे यांनी सांगितले.

Advertisement

Advertisement

Leave a Reply