Take a fresh look at your lifestyle.

भारताच्या ‘त्या’ निर्णयात नाक खुपसत आहे पाकिस्तान; पहा काय मागणी केलीय सुरक्षा परिषदेकडे

दिल्ली : पाकिस्तानच्या राजकारणात काश्मीरला किती महत्व आहे हे पाकिस्तानात सध्या सुरू असणाऱ्या घडामोडींमुळे दिसून येत आहे. भारतात या मुद्द्यावर आता फारशी चर्चा होत नसली तरी पाकिस्तानचे राजकारणच या मुद्द्यावर जिवंत असल्याचे स्पष्ट होत आहे. संधी मिळाली की पाकिस्तानी राज्यकर्ते काश्मीरचा मुद्दा उपस्थित करतातच. जगात एकट्या पडत चाललेल्या पाकिस्तानला या मुद्द्यावर कुणीही साथ देण्यास तयार नाही. तरी पाकिस्तानने मात्र आपला हेका सोडलेला नाही. आताही पाकिस्तानने जागतिक राजकारणात काश्मीर प्रश्न उपस्थित केला आहे.

Advertisement

भारत सरकारने काश्मीरमधील 370 कलम रद्द करण्यास आज म्हणजेच 5 ऑगस्ट रोजी दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. ही वेळ साधत पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी संयुक्त राष्ट्र आणि सुरक्षा समितीस पत्र पाठवले आहे. भारताने कलम 370 रद्द करण्याचा निर्णय मागे घेतला पाहिजे, अशी मागणी या पत्राद्वारे केली आहे. या मुद्द्यावर दोन्ही देशात चर्चा होणे महत्वाचे आहे. मात्र जबाबदारी भारताची आहे. भारताने जम्मू-काश्मीरमध्ये घेतलेले एकतर्फी निर्णय रद्द केले पाहिजेत, असे परराष्ट्र मंत्र्यांनी या पत्रात म्हटले आहे.

Advertisement

भारत सरकारने ऑगस्ट 2019 मध्ये काश्मीरमधील कलम 370 रद्द केले. तेव्हापासून दोन्ही देशात तणाव निर्माण झाला आहे. दोन्ही देशांतील व्यापार बंद पडला आहे. भारतास फारसा फरक पडलेला नाही. पण, पाकिस्तान मात्र चांगलाच अडचणीत सापडला आहे. पाकिस्तानला आवश्यक असणाऱ्या एकूण औषधांपैकी 40 टक्के औषधे भारतातून पुरवठा होतात. पण, आता पुरवठा बंद पडल्याने 2 रुपयांच्या औषधासाठी 20 रुपये द्यावे लागत आहेत. त्यामुळे पाकिस्तानातील औषध उत्पादकांनी पंतप्रधान इम्रान खान यांची भेट घेऊन त्यांना भारतातून मागवण्यात येणाऱ्या औषधांवरील बंदी मागे घेण्यात यावी, अशी मागणी केली होती.

Advertisement

यांसह अन्य समस्या या निर्णयामुळे निर्माण झाल्या आहेत. त्याचा त्रास पाकिस्तानला होता. भारतास प्रत्युत्तर देण्यासाठी पाकिस्तान विविध मार्गांनी त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे. काश्मीरच्या निर्णयास प्रत्युत्तर म्हणून आता पाकिस्तानने बेकायदेशीरपणे ताब्यात घेतलेल्या पीओकेस स्वतंत्र प्रांताचा दर्जा देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. मागील महिन्यात येथे विधानसभेच्या निवडणुका घेण्यात आल्या होत्या. भारताने याचा जोरदार विरोध केला होता.

Advertisement
Advertisement

Leave a Reply