Take a fresh look at your lifestyle.

पाकिस्तानला बसलाय असाही झटका; पहा काय चालू आहे जागतिक राजकारणात

दिल्ली : अमेरिका आणि भारतातील सहकार्य मागील काही वर्षांपासून वाढत आहे. याचा फटका पाकिस्तानला बसत आहे. आता तर पाकिस्तान इतका दुर्लक्षित झाला आहे, की अफगाणिस्तानसारखे संकटग्रस्त देश सुद्धा पाकिस्तानचा राजरोस अपमान करू लागले आहेत. आता तर अफगाणिस्तानच्या राजदूताने पाकिस्तानला अत्यंत कठोर शब्दात फटकारले आहे.

Advertisement

पाकिस्तानकडून तालिबानला नेहमीच संरक्षण मिळत आले आहे. अत्याधुनिक मशीन आणि रसद पुरवठा सुद्धा पाकिस्तान करत असल्याचा आरोप अफगाणिस्तानचे राजदूत गुलाम इसाकजई यांनी केला आहे. याबाबत पुरावे सुद्धा उपलब्ध असल्याचे त्यांनी संयुक्त राष्ट्रांना सांगितले. 15 देश सदस्य असलेल्या युएनएससीची दोन दिवसांपूर्वी बैठक घेण्यात आली. या बैठकीत अफगाणिस्तानमधील सध्याच्या परिस्थितीवर चर्चा करण्यात आली.

Advertisement

एकेकाळी पाकिस्तान हा अमेरिकेचा चांगला मित्र देश म्हणून ओळखला जात होता. आशिया बाबत धोरणे ठरवताना अमेरिकेस पाकिस्तानचा विचार करावा लागत होता. इटकेच नाही तर बऱ्याच बाबतीत अमेरिका भारतापेक्षा पाकिस्तानला जास्त महत्व देत होता. पाकिस्तानने सुद्धा याचा पुरेपूर फायदा घेतला. आता मात्र जागतिक राजकारण बदलले आहे. पाकिस्तानच्या दहशतवादी कारवाया जगासमोर आल्या आहेत. त्यामुळे जगात पाकिस्तान एकटा पडत चालला आहे. आणि त्याचवेळी कधी नव्हे ते भारताचे महत्व वाढत चालले आहे.

Advertisement

दरम्यान, भारताने अफगाणिस्तानात अनेक प्रकल्प सुरू केले आहेत. काही प्रकल्पांचे काम पूर्ण झाले आहे. आणखीही काही प्रकल्प नियोजित आहेत. त्यामुळे अफगाणिस्तानात भारताचा प्रभाव वाढत आहे. आणि पाकिस्तान चीन आणि तालिबान यांना नेमके हेच नको आहे. यामध्ये आता रशियाचेही त्यांना सहकार्य मिळत असल्याचे दिसत आहे. या आधी ज्या वेळी तेथे तालिबानचा प्रभाव होता, त्यावेळी या देशात भारताची उपस्थिती नसल्यासारखीच होती. मात्र अमेरिकेने एंट्री घेतली तेव्हापासून तालिबान आणि पाकिस्तानचा प्रभाव कमी झाला होता. आता मात्र परिस्थिती बदलली आहे. अमेरिकेने काढता पाय घेतल्याने तालिबान आणि पाकिस्तान पुन्हा सक्रिय झाले आहेत. विशेष म्हणजे, यावेळी तर चीनही त्यांच्या बरोबर आहे. त्यामुळे सहाजिकच भारताचा प्रभाव कमी करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

Advertisement
Advertisement

Leave a Reply