Take a fresh look at your lifestyle.

‘त्यांचा’ एकही फोन न आल्याने वैतागलाय पाकिस्तान; पहा कशी वाढलीय त्यांची डोकेदुखी

दिल्ली : जागतिक राजकारणात कुणी कुणाचा कायमचा मित्र आणि शत्रू नसतो. येथे प्रत्येक जण आपला स्वार्थ साधण्यासाठी तत्पर असतो. एकेकाळी पाकिस्तान हा अमेरिकेचा चांगला मित्र देश म्हणून ओळखला जात होता. आशिया बाबत धोरणे ठरवताना अमेरिकेस पाकिस्तानचा विचार करावा लागत होता. इटकेच नाही तर बऱ्याच बाबतीत अमेरिका भारतापेक्षा पाकिस्तानला जास्त महत्व देत होता. पाकिस्तानने सुद्धा याचा पुरेपूर फायदा घेतला.

Advertisement

आता मात्र जागतिक राजकारण बदलले आहे. पाकिस्तानच्या दहशतवादी कारवाया जगासमोर आल्या आहेत. त्यामुळे जगात पाकिस्तान एकटा पडत चालला आहे. आणि त्याचवेळी कधी नव्हे ते भारताचे महत्व वाढत चालले आहे. अमेरिका आणि भारतातील सहकार्य मागील काही वर्षांपासून वाढत आहे. याचा फटका पाकिस्तानला बसत आहे. आता तर पाकिस्तान इतका दुर्लक्षित झाला आहे, की अमेरिकेचे अध्यक्ष पाकिस्तानच्या पंतप्रधानाना फोन सुद्धा करत नाहीत.

Advertisement

आताही असाच एक प्रकार घडला आहे. यामुळे आपला अपमान झाल्याचे पाकिस्तानला वाटत आहे. पाकिस्तानचे राज्यकर्ते सुद्धा चांगलेच अस्वस्थ झाले आहेत. अमेरिकेच्या सत्तेत आल्यानंतर सहा महिने उलटून गेल्यानंतरही जो बायडेन यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना एकही फोन केला नाही. अमेरिकेचे नेते जर पाकिस्तानकडे असेच दुर्लक्ष करत राहिले तर पाकिस्तानकडे सुद्धा अन्य पर्याय आहेत, अशा शब्दात पाकिस्तानने अमेरिकेला इशारा दिला आहे. याआधी पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा मार्गदर्शकांनी अमेरिकेचा दौरा केला होता. अमेरिकेचे विदेश मंत्री त्यांना भेटले सुद्धा नाहीत.

Advertisement

दरम्यान, चीन आणि पाकिस्तान हे दोन्ही देश सध्या भारतास त्रास देण्याचे उद्योग करत आहेत. सीपीईसी प्रकल्पाच्या नावाखाली चीनने पाकिस्तानला अब्जावधी रुपयांचे कर्ज दिले आहे. या प्रकल्पास सुरुवात झाली आहे. मात्र हा प्रकल्प भारतास जसा डोकेदुखी ठरत आहे. तसाच त्रास खुद्द चीन आणि पाकिस्तानला सुद्धा होत आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply