Take a fresh look at your lifestyle.

चीनच्या त्या कारानाम्याने अमेरिकेसह जगाचीही उडालीय झोप; पहा काय संकट आणलेय आता त्यांनी

दिल्ली : चीनला आपला स्वार्थ साधण्यासाठी कोणत्याही देशाचे नुकसान करण्यास काहीच वाटत नाही. चीन कोणत्याही देशाबरोबर मैत्री करताना आधी स्वार्थच पाहतो. चीनचे कुटील डाव वेळीच ओळखता न आल्याने आज अनेक देश चीनच्या जाळ्यात अडकले आहेत. आता जगातील महासत्ता असलेल्या अमेरिकेलाही चीनच्या कुरापतींनी हैराण केले आहे. चीनने आता असा काही उद्योग केला आहे, की ज्यामुळे अमेरिकेत खळबळ उडाली आहे.

Advertisement

प्रत्येक अमेरिकी नागरिकाचे प्रोफाइल तयार करण्यासाठी चीनने त्यासाठी आवश्यक डेटा जमा केला आहे, असा धक्कादायक खुलासा तत्कालीन ट्रंप प्रशासनातील उपराष्ट्रीय सुरक्षा मार्गदर्शकांनी केला आहे. सिनेटच्या गोपनीय समितीस चीनच्या या कृत्यांची माहिती दिली आहे. चीनने 5 जी सह अन्य प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर करुन ही माहिती गोळा केली आहे, हे विशेष आहे. चीन जगभरातील लाखो नागरिकांचे प्रोफाइल तयार करत असतो. या माहितीच्या आधारे चीन दुसऱ्या देशांना धमकी देणे आणि ब्लॅकमेल करण्यासाठी करतो. चीनने ज्या संवेदनशील माहितीची चोरी केली आहे.

Advertisement

या माहितीच्या चीन आता अमेरिकी नागरीकच नाही तर लहान मुलांचेही प्रोफाइल तयार करू शकतो, अशी भिती व्यक्त करण्यात आली आहे. चीनकडून सातत्याने होणारे हे सायबर हमल्यांमुळे अवघ्या जगाचीच डोकेदुखी वाढली आहे. तैवानने मात्र आधीच चीनचे हे डाव ओळखले आहेत. चीनच्या सायबर आक्रमणापासून बचाव करण्यात तैवान सध्या आघाडीवर आहे. तैवानच्या सायबर सुरक्षा प्रमुखांनी सीएनएन बिजनेसला सांगितले होते, की प्रत्येक महिन्यात दोन ते चार कोटींच्या दरम्यान सायबर हमले होत आहेत. या हमल्यांपासून बचाव करण्यासाठी विशेषज्ञांची नियुक्ती केली आहे.

Advertisement

दरम्यान, कोरोना विषाणूच्या उगमाच्या मुद्द्यावर अमेरिकेने चीनची चांगलीच कोंडी केली आहे. कोरोना वायरस वुहान प्रयोगशाळेतुनच लीक झाल्याचा दावा केला जात आहे, काही शास्त्रज्ञांनी तसे पुरावे सुद्धा मिळाले असल्याचे सांगितले आहे. जगभरातील विविध संस्थांचे जे अहवाल येत आहेत, त्यातही हा विषाणू प्रयोगशाळेतूनच पसरल्याची शक्यता व्यक्त केली गेली आहे, तसे आरोपही चीनवर सातत्याने होत आहेत.

Advertisement
Advertisement

Leave a Reply