Take a fresh look at your lifestyle.

पहा चीनने नेमकी काय तयारी केलीय; जागतिक राजकारणात पकड मजबूत करण्यासाठी सुरू आहे ‘ही’ खेळी

दिल्ली : सध्याच्या परिस्थितीत अन्य देशांना लस देणे भारताला निदान आज तरी शक्य नाही. तर दुसरीकडे अमेरिकेने देशांना लस देणार असल्याची घोषणा केली आहे. अमेरिकेच्या घोषणेनंतर मागे राहिल तो चीन कसला, यानंतर चीनने सुद्धा जगातील विविध देशांना तब्बल 200 कोटी कोरोना प्रतिबंधक लसी मोफत देण्याची घोषणा चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जनीपिंग यांनी केली आहे. कोरोना लसी संदर्भात आयोजित आंतरराष्ट्रीय फोरममध्ये चीनने याबाबत घोषणा केली आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार चीनने मागील वर्षातील सप्टेंबर निर्यात केलेल्या 77 कोटी लसींचाही समावेश केला आहे.

Advertisement

याआधी आफ्रिकेतील जवळपास ४० देशांना करोना प्रतिबंधक लस देणार असल्याची घोषणा चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने केली होती.आफ्रिकेतील देश करोनाच्या विळख्यात अडकले आहेत. त्यामुळे या देशांना तातडीने करोना लसींची आवश्यकता आहे. चीनमध्येही लसीकरण सुरू आहे. तरी देखील आफ्रिकेतील देशांची गरज पाहता हा निर्णय घेतल्याचे त्यावेळी सांगण्यात आले होते. कोरोना विषाणूच्या संकटाने अनेक देश हैराण झाले आहे. या विषाणूला रोखण्यासाठी लसीकरण एक प्रभावी माध्यम आहे. त्यामुळे जगभरातील देशांनी लसीकरणावर भर दिला आहे. मात्र, जगात अनेक देश गरीब आहेत. त्यामुळे त्यांना लसींसाठी अन्य देशांवर अवलंबून रहावे लागत आहे. सुरुवातील भारताने जगातील अनेक देशांना लस देऊन मदत केली. आता मात्र, तशी परिस्थिती राहिलेली नाही. चीन जगातील देशांना लस देणार आहे. यामध्येही चीनने आपले मनसुबे साध्य करण्याचा प्रयत्न केला आहे. जगातील सर्वात मोठा लस उत्पादक देश असणारा भारत अन्य देशांना लसी देण्याच्या स्थिती मध्ये नाही .

Advertisement

देशात करोना प्रतिबंगधक लसीकरणही सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे देशात लसींची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. देशात लसींची कमतरता जाणवत असल्याने लसीकरणात अडचणी येत आहेत.अशा परिस्थितीत दुसऱ्या देशांना लस देणे भारतास आजिबात शक्य नाही, हे चीनला माहित आहे. तसेच अमेरिकेने सुद्ध काही देशांना लसी देण्याची घोषणा केली आहे. या परिस्थितीचा फायदा चीनने घेतला आहे. अमेरिकेवर कुरघोडी करण्यासाठी तातडीने आफ्रिकेतील देशांना लस देण्याची घोषणा चीनने केली आहे. चीनच्या या निर्णयाने देशांना मात्र संकट काळात दिलासा मिळाला आहे.

Advertisement

चीनने याआधीही काही देशांना लसी दिल्या आहेत. त्यानंतर आता पुन्हा काही देशांना लसी देणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेने सुद्धा जगातील गरीब देशांना श्रीमंत देशांनी लस द्यावी, असे आवाहन केले होते. कारण, करोना प्रतिबंधक लसींचा मोठा साठा श्रीमंत देशांकडे आहे. तसेच काही देशांनी लस उत्पादक कंपन्यांना कोट्यावधींच्या लसींची ऑर्डर देऊन ठेवली आहे. अशा परिस्थितीत गरीब देशांना लस मिळणे कठीण होणार आहे. त्यामुळेत जागतिक आरोग्य संघटनेने श्रीमंत देशांना आवाहन केले होते.

Advertisement
Advertisement

Leave a Reply