Take a fresh look at your lifestyle.

तर ‘हा’ बडा देशच होणार नकाशातून गायब; पहा काय भीती वाटतेय संशोधकांना

दिल्ली : जगासाठी सध्याचा काळ संकटांचाच आहे. कोरोनाने गेल्या दीड वर्षांपासून मुक्काम ठोकला आहे. हा घातक आजार आता नव्या रुपात दहशत निर्माण करत आहे. त्यानंतर आता सततच्या नैसर्गिक संकटांनी त्यात भर घातली आहे. काही देशात चक्रीवादळे, तर कुठे मुसळधार पाऊस. काही ठिकाणी भीषण दुष्काळ तर काही ठिकाणी ज्वालामुखीचा उद्रेक अशी संकटे सुरू आहेत. त्यानंतर आता युरोपातील एका देशात गंभीर संकट येण्याची भिती शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. जागतिक हवामानात सातत्याने होणारे बदल या संभाव्य संकटास कारणीभूत ठरतील, असेही या शास्त्रज्ञांनी सांगितले आहे.

Advertisement

सध्याच्या काळात ग्लोबल वॉर्मिंग ही जगासमोरील मोठी समस्या आहे. प्रत्येक देशास या समस्येचा सामना करावा लागत आहे. काही देशांना मात्र या समस्येचा जास्त फटका बसत आहे. ब्रिटेन या देशास हवामान बदलाचा फटका बसत आहे. शास्त्रज्ञांनी तर असा दावा केला आहे, की सध्या हवामानात वेगाने बदल होत आहेत. त्यामुळे येत्या काळात ब्रिटेन देश जगाच्या नकाशावरुन गायब होऊ शकतो. म्हणजेच, हा देश बर्फाखाली जाऊ शकतो.

Advertisement

मागील एक हजार पर्यावरणात असे काही बदल झाले आहेत की त्याचा परिणाम ब्रिटेन या देशावर होण्याची शक्यता आहे. एक हजार वर्षात प्रथमच आखाती देशातून युरोपला येणारे गरम वारे सर्वाधिक कमकुवत बनले आहेत. अटलांटिक सर्क्युलेशनमुळे युरोपमध्ये गरम हवा येते. सध्याच्या परिस्थितीत हा प्रवाह कमी झाला आहे. त्यामुळे या देशातील तापमान कमी होत चालले आहे. या परिस्थितीत सुधारणा झाली नाही तर आगामी काळात ब्रिटन बर्फाखाली जाऊ शकतो, अशी भिती शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. डॉ. निकलस बायर्स यांनी म्हटले आहे, की आखाती देशांतून येणाऱ्या गरम वाऱ्यांचे प्रमाण खूप कमी झाले आहे. त्यामुळे संपूर्ण युरोपचेच तापमान कमी होत चालले आहे. त्यामुळे फक्त ब्रिटनमध्येच हा धोका निर्माण होऊ शकतो, अन्य देशांनाही त्याचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply