Take a fresh look at your lifestyle.

भर पावसाळ्यात पुढील पाचही दिवस उन्हाळ्याचे..! पहा कुठे ओढवणार आहे ही परिस्थिती

दिल्ली : देशात अनेक ठिकाणी आता पावसाने विश्रांती घेतली आहे. ज्या ठिकाणी मुसळधार पाऊस पडत होता तेथेही आता पावसाचा जोर कमी पडला आहे. दिल्लीत रविवारी पावसाचा अंदाज व्यक्त केल्यानंतर आता हवामान विभागाने वेगळाच अंदाज व्यक्त केला आहे. भारतीय हवामान विभागाने आता राजधानी दिल्ली शहरात 10 ते 15 ऑगस्ट दरम्यान दिल्लीकर नागरिक असह्य उकाड्याने हैराण होणार आहेत.

Advertisement

देशात सर्वत्र मान्सूनचा पाऊस होत आहे. सुरुवातीस जोरदार बरसल्यानंतर आता मात्र पाऊस गायब झाला आहे. अनेक शहरात अशी परिस्थिती आहे. त्यामुळे वातावरणात पुन्हा उष्णता वाढत चालली आहे. शनिवारी दिल्लीत जास्तीत जास्त 33.2 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद घेण्यात आली होती. त्यामुळे येथे दिवसाचे तापमानात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.

Advertisement

मध्य प्रदेश राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे परिस्थिती अत्यंत खराब झाली आहे. हजारो गावातील लोक पाण्यात अडकले आहेत. शिवपुरी, दतिया, ग्वालियर मध्ये मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. यासाठी सैन्याची मदत घेण्यात येत आहे. सध्या राज्यातील तब्बल 1171 गावे महापूर आणि मुसळधार पावसाच्या तडाख्यात सापडली आहेत. शिवपुरी आणि शयोपुर जिल्ह्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. शिवपुरी जिल्ह्यात 470 मिलिमीटर पाऊस पडला आहे. या दोन्ही जिल्ह्यातील जवळपास 200 गावे जलमय झाली आहेत. मणिखेडा धरणाचे 10 दरवाजे उघडले गेले आहेत. ज्यामुळे परिस्थिती अधिकच खराब होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Advertisement

वीरपूर आणि विजयपूर मध्ये परिस्थिती जास्तच बिघडल्यानंतर येथील आसपासची 30 गावे खाली करण्यात येत आहेत. दतिया जिल्ह्यातील 6 गावात सुद्धा अशीच गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. या व्यतिरिक्त उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार, हिमाचल प्रदेश या राज्यातही मुसळधार पाऊस होता. तसेच महाराष्ट्रातही येत्या काही दिवसात पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply