Take a fresh look at your lifestyle.

म्हणून ‘मेडलवीर मोदीं’च्या कौतुकावर ‘खेळाडू’ सिंग भडकले..! पहा कोणता फोटो होतोय जोरात व्हायरल

पुणे : सध्या देशात काहीही चांगले झाले की ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किंवा भाजपने केले आणि काहीही वाईट किंवा दुर्दैवी घटना घडली की त्याची जबाबदारी भारतीय नागरिक किंवा काँग्रेस पक्ष यांच्यावर टाकण्याची परंपरा रूढ झाली आहे. आताही क्रीडाक्षेत्रात देशाच लौकिक उंचावलेल्या ऑलिम्पिकवीरांना याची प्रचीती येत आहे. ‘मेडलवीर’ खेळाडूंच्या कौतुक सोहळ्यात मोदींचा मोठा आणि खेळाडूंचा अगदीच छोटा फोटो लावून हे राजकारण केले जात आहे. त्याची सध्या देशभरात चर्चा सुरू आहे.

Advertisement

Advertisement

यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केलेली असतानाच ऑलिम्पिक पदक विजेता विजेंदर सिंगनेही याबद्दल ट्विट करत मोदी सरकारला टोला लगावला आहे सिंग यांनी ट्विटरवर फोटो शेअर करून म्हटले आहे की, सर्व गोष्टी या पीआरचा भाग आहेत आणि पीआरच सर्वकाही आहे. तसेच हाच फोटो शेअर करून भारतीय युवा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास बी. व्ही. यांनीही ‘पदक मोदीजींनी जिंकून आणलंय का?’ असा कळीचा मुद्दा उपस्थित केला आहे.

Advertisement

पदक जिंकून आलेल्या खेळाडूंचा सत्कार करण्यासाठी नवी दिल्लीमधील हॉटेल अशोकामध्ये विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते. मंचावरील या पोस्टवर सुवर्ण, रौप्य आणि कांस्यपदक विजेत्या खेळाडूंचे फोटो असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो हा खेळाडूंच्या फोटोच्या आकारापेक्षा खूपच मोठा आणि दिव्य कार्य केल्याच्या थाटात होता. केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर, माजी केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू, केंद्रीय राज्य क्रीडामंत्री निशित प्रामाणिक असेही दिग्गज ‘मेडलवीर’ कार्यक्रमाला उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Advertisement

Leave a Reply