Take a fresh look at your lifestyle.

‘त्या’ क्षेत्रात भारत करणार अमेरिकेचीही बरोबरी; पहा गडकरींनी काय विश्वास व्यक्त केलाय तो

अहमदाबाद : सध्या देशात महामार्ग बांधणी वेगाने होत आहे. महामार्गाचा दर्जा आणि गुणवत्ता या महत्वाच्या गोष्टींकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे. विशेष म्हणजे, पुढील तीन वर्षात भारतातील रस्ते सुद्धा अमेरिकेतील रस्त्यांप्रमाणे दर्जेदार असतील, असा दावा केंद्रीय रस्ते व राजमार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे.

Advertisement

देशात एक काळ असा होता की दररोज फक्त दोन किमी लांबीच्या दराने राष्ट्रीय महामार्ग तयार होत होते. आज मात्र 38 किलोमीटर प्रति दिवस या वेगाने महामार्ग तयार होत आहेत. भारतमाला परियोजने अंतर्गत गुजरात राज्यात 1080 किलोमीटर रस्ते तयार होणार आहेत. याव्यतिरिक्त महाराष्ट्र, पंजाब, राजस्थान, हरियाणा या राज्यातही रस्ते तयार केले जाणार आहेत.

Advertisement

गुजरात राज्यातील बनासकांठा येथे एलिवेटेड कॉरिडॉरचे लोकार्पण गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी गडकरी यांनी देशातील महामार्ग बांधणीबाबत माहिती दिली. देशात मागील काही वर्षांपासून रस्ते बांधणीचा वेग वाढला आहे. नवे रस्ते, महामार्ग कमी वेळात तयार होत आहे. एका दिवसात 25 ते 30 किलोमीटर या वेगाने रस्ते तयार होत आहेत. त्यामुळे देशभरात नवे रस्ते वेगाने तयार होत आहेत. वाहनांची संंख्या वेगाने वाढत आहे. दररोज हजारोंच्या संख्येने नवीन वाहने रस्त्यावर येत आहेत. त्यामुळे रस्त्यांची संख्या वाढणे तसेच रस्त्यांचा दर्जा सुद्धा चांगला असणे जास्त महत्वाचे आहे. त्यामुळे या गोष्टींकडेही विशेष लक्ष देण्यात येत आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply