Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. तिथे करोना झालाय आउट ऑफ कंट्रोल; पहा काय परिस्थिती ओढवलीय

दिल्ली : अमेरिका पुन्हा एकदा कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. देशात कोरोना आटोक्यात येत असतानाच नवे व्हेरिएंट दाखल झाले आणि होत्याचे नव्हते झाले. कोरोनाचा हा झटका सुद्धा इतका जबरदस्त आहे की देशात दिवसेंदिवस परिस्थिती अतिशय खराब होत आहे. देशात अनेक ठिकाणी आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे. टेक्सास राज्याची राजधानी ऑस्टिन शहरात तर परिस्थिती अतिशय विदारक आहे. येथील दवाखान्यात आयसीयूमध्ये फक्त सहा बेड रिकामे आहेत. शहराची लोकसंख्या मात्र 24 लाख आहे. राज्याच्या आरोग्य विभागाच्या माहितीनुसार दवाखान्यांमध्ये 313 व्हेंटीलेटर्स आहेत.

Advertisement

डेल्टा व्हेरिएंटमुळे शहरात मागील एक आठवड्याच्या काळात रुग्णांचे हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याचे प्रमाण 600 टक्क्यांनी वाढले आहे. तर आयसीयूमध्ये दाखल होण्याचे प्रमाण 570 टक्क्यांनी वाढले आहे. याआधी 4 जुलै रोजी फक्त 8 रुग्ण व्हेंटीलेटरवर होते. एका दिवसातच यांची संख्या 102 पर्यंत पोहोचली. टेक्सास राज्यात एकूण 439 आयसीयू बेड आणि 6691 व्हेंटीलेटर आहेत. अमेरिकी विषाणू तज्ज्ञ डॉ. एंथनी फाउची यांच्या मते देशातील एकूण कोरोना प्रकरणांपैकी 40 टक्के प्रकरणे टेक्सास आणि फ्लोरिडा या दोन राज्यांतून येत आहेत.

Advertisement

जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख डॉ. टेड्रोस घेब्रेयेसस यांनी असा इशारा दिला होता, की जग कोविड १९ च्या महामारीच्या अत्यंत धोकादायक अवस्थेत आहे. डेल्टासारखे व्हेरिएंट आधिक संक्रामक असून बऱ्याच देशांमध्ये पसरत आहे. अद्याप कोणताही देश या संकटातून बाहेर आलेला नाही. कोरोनाचा डेल्टा व्हेरिएंट आधिक धोकादायक आहे, आणि काळानुसार तो आणखी बदलत आहे. त्यामुळे आपणास सतत देखरेख ठेवणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले होते. आजमितीस जगातील 135 देशांमध्ये हा व्हेरिएंट पसरला आहे. लसीकरण वेगाने न केल्यास यामुळे अवघे जग संकटात सापडू शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले होते.

Advertisement

आतापर्यंत कोरोनाच्या जितक्या व्हेरिएंटची माहिती मिळाली आहे, त्यामध्ये डेल्टा व्हेरिएंट सर्वाधिक संक्रामक आहे. कोरोना प्रतिबंधक लस न घेतलेल्या लोकांमध्ये हा व्हेरिएंट वेगाने फैलावत चालला आहे. सध्या कोरोनाचे रुग्ण कमी होत असल्याने काही देशांनी लॉकडाऊनचे निर्बंधांत सवलती दिल्या आहेत. त्यामुळे सुद्धा जगभरात कोरोना संक्रमण पुन्हा वाढत चालले आहे. कोरोनाचा प्रसार रोखायचा असेल तर सप्टेंबरपर्यंत प्रत्येक देशात किमान १० टक्के तरी लसीकरण झाले पाहिजे, असे आवाहन डब्ल्यूएचओने केले आहे. जोपर्यंत जगातील प्रत्येक ठिकाणी महामारी नष्ट होणार नाही तोपर्यंत या महामारीचा पूर्णपणे नायनाट होणार नाही. जगात काही देश लसीकरणात खूप पुढे गेले आहेत तर काही देशात अजूनही कोरोना प्रतिबंधक लस मिळालेल्या नाहीत.

Advertisement
Advertisement

Leave a Reply