Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. योगींचा UP देणार थेट चीनला टक्कर; पहा काय योजना आहे राज्य सरकारची

दिल्ली : चीन आणि भारतात सध्या तणावाचे वातावरण असले तरी या दोन्ही देशांतील व्यापार मात्र दिवसेंदिवस वाढत चालला आहे. केंद्रातील मोदी सरकारच्या आत्मनर्भर भारत प्रकल्पास हा तसा झटकाच आहे. चीन बरोबर सीमा विवाद सुरू असला तरी आजही अनेक वस्तू चीन कडूनच घ्याव्या लागतात. त्यामुळे चीनच्या या मक्तेदारीचा बंदोबस्त करण्यासाठी भारतात वेगळेच नियोजन सुरू झाले आहे.
व्यापाराच्या स्पर्धेत चीनला मागे टाकणे सध्याच्या काळात शक्यच नाही. पण, काही प्रमाणात का होईना चीनला झटका देता येईल, तसेच देशही आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने आणखी पुढे जाईल, असा सरकारचा विचार आहे. यामध्ये मोदी सरकारला उत्तर प्रदेशचे सहकार्य मिळाले आहे.

Advertisement

उत्तर प्रदेशाच्या योगी आदित्यनाथ सरकारने नोएडा येथे मोठे टॉय पार्क तयार केले आहे. या पार्कमध्ये खेळण्या तयार करण्याचे कारखाने सुरू करण्यासाठी 134 उद्योगपतींनी जमिनी घेतल्या आहेत. जवळपास 410.13 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. या करखान्यांमुळे जवळपास सहा हजारांपेक्षा लोकांना रोजगार सुद्धा उपलब्ध होणार आहे. देशात सध्या खेळण्या तयार करणारे चार हजारांपेक्षा जास्त कारखाने आहेत. टॉय पार्क मध्ये जमीन घेणाऱ्या कंपन्यांमध्ये सुपर शूज, फन जू टॉइज इंडिया, आयुष टॉय मार्केटिंग, भारत प्लास्टिक, आरआरएस ट्रेडर्स या कंपन्यांचा समावेश आहे. टॉय पार्कमध्ये प्लास्टिक आणि लाकडापासून खेळणी तयार करण्यात येणार आहे. तसेच बॅटरीवर चालणारी खेळणी सुद्धा येथे तयार होणार आहे. या कंपन्या आता थेट चीनच्या कंपन्याना टक्कर देणार आहे.

Advertisement

दरम्यान, मोबाइलच्या दुनियेत जगात शाओमी कंपनीने जगात दबदबा निर्माण केला आहे. जगातील दिग्गज कंपनी एप्पलला पछाडले आहे. त्यानंतर आता या कंपनीने भारतात सुद्धा रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली आहे. सध्या भारत आणि चीन यांच्यात वाद सुरू आहेत. मात्र त्याचा व्यापारावर परिणाम झालेला नाही. जूनच्या तिमाहीत चिनी स्मार्टफोन कंपन्यांनी भारताच्या बाजारपेठेतील 79 टक्के हिस्सा काबीज केला आहे. याचा अर्थ असा आहे की प्रत्येक 10 चिनी स्मार्टफोनपैकी 8 स्मार्टफोन विकले गेले आहेत.

Advertisement
Advertisement

Leave a Reply