Take a fresh look at your lifestyle.

सोन्याला पुन्हा झळाळी..! आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत घसरलेलीच, पाहा सराफ बाजारातील स्थिती..

नवी दिल्ली : कोरोनातून परिस्थिती निवळत असताना, सगळे व्यवहार रुळावर येत आहेत. त्याचा परिणाम सराफ बाजारावरही झाल्याचे दिसून येत आहे. गेली दोन दिवस सोन्याची झळाळी उतरल्याचे दिसत होते. सोन्याच्या दरात शुक्रवारी 1000 रुपये, तर काल (सोमवारी) 700 रुपये प्रति तोळा घसरले होते. मात्र, त्यानंतर आज सोन्याच्या किंमतीत तेजी पाहायला मिळाली.

Advertisement

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) आज सोन्याचे दर वधारले. ‘एमसीएक्स’वर ऑक्टोबरच्या सोन्याची वायदे किंमत 0.37 टक्क्यांनी वाढली, तर चांदीच्या किंमतीतही 0.84 टक्क्यांची वाढ झाल्याचे पाहायला मिळाले.

Advertisement

‘एमसीएक्स’वर ऑक्टोबरच्या सोन्याची वायदे किंमत 170 रुपयांनी वाढून 46,056 रुपये प्रति तोळा झाली, तर सप्टेंबरच्या चांदीची वायदे किंमत 525 रुपयांच्या वाढीनंतर 63,162 रुपये प्रति किलो झाली होती.

Advertisement

दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत गेल्या काही महिन्यांच्या निच्चांकी पातळीवर पोहोचली आहे. स्पॉट गोल्डची किंमत 1,730.47 डॉलर प्रति औंस झाली. चांदीचे दर 23.43 डॉलर प्रति औंस होते. आधीच्या सत्रात चांदीचे दर गेल्या 8 महिन्यांतील निच्चांकी पातळीवर पोहोचले होते.

Advertisement

स्वस्तात सोनेखरेदीची संधी
सरकारकडून 9 ऑगस्ट ते 13 ऑगस्टपर्यंत सॉव्हरेन गोल्ड बाँड इश्यू करण्यात आले आहेत. त्यामुळे ग्राहकांना स्वस्तात सोनेखरेदीची संधी आहे. सरकारकडून किंमत 4,790 रुपये प्रति ग्रॅम आहेत. ही सॉव्हरेन गोल्ड बाँडची पाचवी सीरिज आहे.

Advertisement

उज्ज्वला योजनेचे लाॅंचिंग, मोदी सरकारकडून गरीब कुटुंबाना मोफत गॅस कनेक्शन, कसा करणार अर्ज..?
म्हणून ‘मेडलवीर मोदीं’च्या कौतुकावर खेळाडू सिंग भडकले..! पहा कोणता फोटो होतोय जोरात व्हायरल

Advertisement
Advertisement

Leave a Reply