Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. भारतात सुरुये इंटरनेटचा दणका; पहा नेमके काय म्हटलेय केंद्र सरकारने

मुंबई : काही वर्षांपूर्वी ‘स्मार्टफोन’, ‘इंटरनेट’ हे शब्दही कुणाला माहीत नव्हते. मात्र, आज या दोन गोष्टी नसतील तर… असा विचार करणेसुद्धा शक्य नाही, असा सध्याचा काळ आहे. खिशात स्मार्टफोन नाही असा माणूस आज क्वचितच सापडेल. नुसता फोन असून काय उपयोग इंटरनेट पाहिजेच ना.. त्यामुळे आज जगभरात इंटरनेट युजर वेगाने वाढत आहेत.

Advertisement

विकसित देश असो किंवा गरीब देश, मेट्रो सिटी असो नाही तर एखादे छोटे खेडे सगळीकडेच इंटरनेटचे युजर्स वेगाने वाढत आहे. भारतासारख्या वेगाने प्रगती करणाऱ्या देशात तर आजमितीस इंटरनेटचे कोट्यवधी युजर आहेत आणि हा आकडा निरंतर वाढतच चालला आहे. तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही पण, भारतात आजमितीस तब्बल 82 कोटी लोक इंटरनेटचा वापर करत आहेत, अशी माहिती खुद्द केंद्र सरकारनेच दिली आहे.

Advertisement

केंद्र सरकारने राज्यसभेत सांगितले, की देशात आजमितीस 82 कोटी लोक इंटरनेटचा वापर करत आहेत. इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी याबाबत एका प्रश्नाचे उत्तर देताना ही माहिती दिली. देशात सध्या एक लाख 57 हजार 383 ग्रामपंचायतींमध्ये हाई स्पीड इंटरनेटची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय) च्या अनुसार 31 मार्च 2021 पर्यंत देशात 82.53 कोटी इंटरनेट ग्राहक होते. देशातील ग्रामीण भागात आज तीस कोटी तर शहरी भागात जवळपास पन्नास कोटींपेक्षा जास्त लोक इंटरनेटचा वापर करत आहेत, असेही त्यांनी सांगितले.

Advertisement

दरम्यान, देशात 45 टक्के दराप्रमाणे इंटरनेट युजर्सची संख्या वाढत आहे. सध्या देशातील शहरी भागात दुप्पट वेगाने इंटरनेट उपलब्ध होत आहे. त्या तुलनेत ग्रामीण भाग बराच मागे आहे. मात्र, या भागात दरवर्षी वाढणार्‍या इंटरनेट युजर्सची संख्या शहरी भागापेक्षा जास्त आहे. आजमितीस शहरी भागात 50 कोटींपेक्षा जास्त इंटरनेट वापरकर्ते आहेत. तर त्याच वेळी ग्रामीण भागातही इंटरनेट युजर्सची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. एका आकडेवारीनुसार आज भारतातल्या ग्रामीण भागांमध्ये तीस कोटी लोक इंटरनेटचा वापर करत आहेत.

Advertisement

याआधी इंटरनेट कंपनी ‘आयएएमएआय’ आणि सहयोगी कंपनी ‘Kanter’ ने याबाबत सर्वे केला होता. यामध्ये असे दिसून आले, की ग्रामीण भागातील अगदी लहान खेड्यातही प्रत्येकी पाच व्यक्तींपैकी दोन जण इंटरनेट वापरतात. तर दुसरीकडे देशातील नऊ मेट्रो शहरात 33 टक्के इंटरनेट यूजर्स आहेत. देशाच्या 143 कोटी लोकसंख्येत 62.2 कोटी लोक आज इंटरनेटचा वापर करत आहेत. ग्रामीण भागात मात्र इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या कमी आहे नजीकच्या काळात यामध्ये वाढ होणार असल्याचे या अहवालात म्हटले होते.

Advertisement
Advertisement

Leave a Reply