Take a fresh look at your lifestyle.

रशियाने खेळलीय अशीही खेळी; पहा कसा बसणार भारताला झटका आणि पाकिस्तानचे काय होणार ते

दिल्ली : जागतिक राजकारणात कुणी कुणाचा कायमचा मित्र आणि शत्रू नसतो. येथे प्रत्येक जण आपला स्वार्थ साधण्यासाठी तत्पर असतात. भारत हा रशियाचा जुना मित्र आहे. परंतु सध्या जागतिक राजकारणात बदल झाला आहे. अमेरिका आणि भारत यांच्यामध्ये सहकार्य वाढले आहे. त्याचा परिणाम रशिया आणि भारताच्या संबंधांवर झाला आहे. रशियाकडून भारताकडे दुर्लक्ष केले जात आहे. आताही असाच प्रकार घडला आहे. रशियाने घेतलेल्या निर्णयामुळे भारताची डोकेदुखी वाढणार आहे.

Advertisement

अमेरिकेने अफगाणिस्तानातून माघार घेतल्यामुळे या देशातील परिस्थिती अत्यंत स्फोटक बनली आहे. तालिबानने या देशातील बर्‍याचशा जिल्ह्यांवर नियंत्रण मिळवल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी रशियाने एक बैठक आयोजित केली होती. मात्र, या बैठकीत रशियाने भारताला आमंत्रण दिले नाही. या उलट भारताचे शत्रू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चीन आणि पाकिस्तानला मान दिला. अशा पद्धतीने रशिया भारताकडे दुर्लक्ष करू लागला आहे. रशियाने या आधीही एक बैठक बोलावली होती त्या बैठकीलाही भारताला निमंत्रित करण्यात आलं नव्हतं. विशेष म्हणजे, रशिया हा भारताचा जुना मित्र म्हणून ओळखला जातो. दोन्ही देशांमध्ये होणारा व्यापारही मोठा आहे.

Advertisement

भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रांची खरेदी करतो. या मुद्द्यावर अमेरिकेने बऱ्याच वेळा नाराजी व्यक्त केली आहे. मात्र, भारताने अमेरिकेचाही विचार न करता रशियाकडून शस्त्रांची खरेदी सुरूच ठेवली आहे. असे असतानाही रशियाने अफगाणिस्तान प्रश्नावर चर्चा करण्यासाठी भारतास गृहीत धरलेले नाही. भारताची अफगाणिस्तानमध्ये मोठी गुंतवणूक आहे. कोट्यावधींचे प्रकल्प सुरू आहेत. त्यामुळे अफगाणिस्तानचा प्रश्न भारतासाठी देखील खूप महत्त्वाचा आहे. परंतु, अशा परिस्थितीत रशियाने चीन आणि पाकिस्तानला आमंत्रण देऊन एक प्रकारे भारताची डोकेदुखीत वाढ करण्याचे काम मात्र केले आहे.

Advertisement

दरम्यान, भारताने अफगाणिस्तानात अनेक प्रकल्प सुरू केले आहेत. काही प्रकल्पांचे काम पूर्ण झाले आहे. आणखीही काही प्रकल्प नियोजित आहेत. त्यामुळे अफगाणिस्तानात भारताचा प्रभाव वाढत आहे. आणि पाकिस्तान चीन आणि तालिबान यांना नेमके हेच नको आहे. यामध्ये आता रशियाचेही त्यांना सहकार्य मिळत असल्याचे दिसत आहे. याआधी ज्यावेळी या देशात तालिबानचा प्रभाव होता, त्यावेळी येथे भारताची उपस्थिती नसल्यासारखीच होती. मात्र अमेरिकेने एंट्री घेतली तेव्हापासून तालिबान आणि पाकिस्तानचा प्रभाव कमी झाला होता. आता मात्र परिस्थिती बदलली आहे. अमेरिकेने काढता पाय घेतल्याने तालिबान आणि पाकिस्तान पुन्हा सक्रिय झाले आहेत. विशेष म्हणजे, यावेळी तर चीनही त्यांच्या बरोबर आहे. त्यामुळे सहाजिकच भारताचा प्रभाव कमी करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

Advertisement
Advertisement

Leave a Reply