Take a fresh look at your lifestyle.

घरोघरी पाणी देण्यासाठीच्या योजनेला ‘तिथे’ लागलाय ब्रेक; पहा केंद्राने का व्यक्त केलीय नाराजी

रायपूर : उन्हाळ्याच्या दिवसात पाणी टंचाई असेल तर मग विचारायलाच नको, या ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागतो. सरकारलाही या समस्येची जाणीव आहे. त्यामुळे देशातील पाण्याचे हे संकट दूर करण्यासाठी केंद्र सरकारने नियोजन केले आहे. सन 2024 पर्यंत देशातील प्रत्येक घरात पाइपलाइनद्वारे पाणी पुरवठा करण्याचे केंद्र सरकारने निश्चित केले आहे. या काळात हा प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहे. सध्या छत्तीसगड या प्रकल्पाचे काम सुरू असून येथे 2023 पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे सरकारचे नियोजन आहे.

Advertisement

असे असले तरी छत्तीसगड सरकारच्या कामगिरीवर मात्र केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र शेखावत यांनी नाराजी व्यक्त केली. या प्रकल्पांतर्गत छत्तीसगडची कामगिरी सर्वात खराब आहे. या प्रकल्पासाठी केंद्र सरकारने दिलेला निधी राज्य सरकारला खर्च करता आलेला नाही. यावर्षातही एकूण 1900 कोटींपैकी फक्त 400 कोटी रुपये खर्च करता आले आहेत. देशात सध्या 74 असे जिल्हे आहेत की जिथे 100 टक्के पाणीपुरवठा सुविधा आहे. या क्रमवारीत छत्तीसगड 30 व्या क्रमांकावर असल्याचे शेखावत यांनी सांगितले.

Advertisement

दरम्यान, उन्हाळ्यात ग्रामीण भागात अनेक ठिकाणी पाणी टंचाई निर्माण होते. वाड्या वस्त्यांवर राहणाऱ्या नागरिकांना पाण्यासाठी कडाक्याच्या उन्हात पायपीट करावी लागते. त्यामुळे त्यांचा हा त्रास कमी करण्यासाठी नागरिकांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतो. यावेळी तर परिस्थिती आधिकच भीषण आहे. कारण यावेळी देशभरात कोरोनाचे संकट आहे. आजच्या काळात देश वेगाने प्रगती करत असला तरी देशात अनेक समस्या कायम आहेत. देशातील बहुतांश लोकसंख्या ग्रामीण भागात राहते. शहरी भागात मुलभूत सुविधा मिळत असल्या तरी ग्रामीण भागात अनेक ठिकाणी आजही तशी परिस्थिती नाही. लोकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते.

Advertisement
Advertisement

Leave a Reply